Home Decor : घरातल्या या ५ चुकांमुळे सुंदरता आणि पॉझिटिव्ह एनर्जी दोन्ही गायब! लगेच बदला

Published : Aug 11, 2026, 12:50 PM IST
Home Decor : घरातल्या या ५ चुकांमुळे सुंदरता आणि पॉझिटिव्ह एनर्जी दोन्ही गायब! लगेच बदला

सार

आपलं घर अधिक सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी इंटेरिअर करताना कोणत्या ५ मोठ्या चुका टाळल्या पाहिजेत, हे जाणून घ्या. या चुकांमुळे घराची सुंदरता तर कमी होतेच, पण पॉझिटिव्ह एनर्जीवरही परिणाम होतो.

मुंबई : फ्लोरल पॅटर्न निवडणं, लाईट कलर थीम वापरणं किंवा फर्निचर एका विशिष्ट पद्धतीने लावणं... घर सजवताना प्रत्येकाची स्वतःची एक आवड असते. पण काही वेळा आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे घराची सुंदरता आणि आकर्षण कमी होतं. जाणून घ्या अशा ५ मोठ्या चुका ज्या टाळल्यास तुमचं घर अधिक सुंदर आणि आकर्षक दिसेल.

फक्त सीलिंग लाईट वापरणं

किचन किंवा ऑफिस रूममध्ये भरपूर प्रकाशासाठी मोठा सीलिंग लाईट लावणं ठीक आहे. पण इतर खोल्यांमध्ये फक्त एकच लाईट वापरल्यास हॉस्पिटलच्या वेटिंग रूमसारखं कंटाळवाणं वातावरण तयार होतं. लिव्हिंग रूम किंवा बेडरूममध्ये शांत आणि सुंदर वातावरणासाठी एका मोठ्या लाईटऐवजी अनेक छोटे-छोटे लेयर्ड लाईट्स वापरा.

अनावश्यक वस्तूंचा ढिगारा साचू देणं

घरात आलेली पत्रं, टेबलावर पसरलेल्या वस्तू किंवा गरजेपेक्षा जास्त सजावटीच्या वस्तू... या सगळ्यामुळे खोलीचा लुक खराब होतो. रोजच्या गरजेच्या वस्तू सहज काढता येतील अशा स्टोरेजची सोय केल्यास घर जास्त स्वच्छ आणि नीटनेटकं दिसतं.

भिंती पूर्णपणे रिकाम्या ठेवणं

घराच्या भिंती पूर्णपणे रिकाम्या असल्या की खूपच कंटाळवाणं वाटतं. भिंतींवर तुम्हाला बघून आनंद होईल अशी चित्रं किंवा आर्ट वर्क लावा. सुरुवातीला छोट्या-छोट्या आर्ट पीसने भिंती सजवायला सुरुवात करू शकता.

प्रत्येक जागेत सजावटीच्या वस्तू भरणं

टेबल आणि शेल्फवर दिसणारी प्रत्येक सजावटीची वस्तू विकत घेऊन घराच्या कानाकोपऱ्यात भरण्याची सवय टाळा. सगळ्याच भिंती आणि टेबलांवर वस्तू भरल्या की खोलीची सुंदरता कमी होते आणि घरात अस्वस्थ वाटू लागतं. डोळ्यांना आराम देणाऱ्या रिकाम्या जागा (Breathing Space) सुद्धा इंटेरिअरमध्ये महत्त्वाच्या असतात.

माप न घेता फर्निचर खरेदी करणं

एखादं फर्निचर घराच्या मुख्य दरवाजातून आत येतंय, याचा अर्थ ते त्या खोलीसाठी योग्य आहेच असं नाही. खोलीच्या आकाराच्या मानाने खूप मोठं किंवा खूप लहान फर्निचर ठेवलं, तर खोलीत पुरेशी जागाच उरत नाही. कोणतंही फर्निचर खरेदी करण्यापूर्वी तुमच्या खोलीचं अचूक माप नक्की घ्या.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Goddess Durga Mantras : दुर्गा देवीचे 9 पॉवरफुल मंत्र... जपल्यास धन आणि ऐश्वर्य वाढेल, अत्यंत लाभदायक
Cloves Benefits : उशीखाली लवंग ठेवून झोपलात तर काय होतं?