Crime News : बाथरुममधील लाद्या काढल्या, आत पतीची बॉडी... पत्नीकडूनच भयंकर कृत्य, धक्कादायक घटनेने पोलिसही हैराण

Published : Jul 04, 2026, 06:42 PM IST
Wife killed Husband

सार

Wife Killed Husband : बेपत्ता व्यक्तीची बॉडी बाथरुममध्ये आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बाथरुमच्या लाद्यांखाली त्याचा मृतदेह आढळल्याने पोलिसही हैराण झाले आहेत. नेमकं काय घडलं? 

आग्रा : पुण्यात प्रेमप्रकरणातून एका तरुणीने प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या पतीची हत्या केली. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एक पत्नीने पतीची हत्या करुन त्याचा मृतदेह बाथरुममध्ये खड्डा करुन त्यात पुरण्यात आलं. महत्त्वाची बाब म्हणजे इतक्या भयंकर हत्याकांडचा तब्बल ४५ दिवसांनी उलगडा झाला. या घटनेने पोलिसही हैराण असून पुढील प्रकरणाचा तपास सुरू आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये ही घटना समोर आली आहे. ४४ वर्षीय सुरेंद्र शर्मा १८ मे पासून बेपत्ता होते. आठ दिवसांनी ते बेपत्ता झाल्याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली. सुरेंद्र यांना त्यांचे कुटुंबिय सतत फोन करत होते, त्यांचा शोध घेत होते, पण त्यांचा कुठेही पत्ता लागत नव्हता. पोलिसांकडूनही तपास सुरू होता. सुरेंद्र बेपत्ता झाल्यानंतर त्यांची पत्नी सतत ते कुठेतरी गेल्याचं सांगत होती. सतत ४५ दिवस सुरेंद्र यांची पत्नी विचारणा करणाऱ्यांना अशाच प्रकारे सांगत राहिली. पण तपासादरम्यान पोलिसांना तसंच सुरेंद्रच्या भावाला सुरेंद्रच्या पत्नीच्या विधानांवर संशय आला.

संशयानंतर पोलिसांनी सुरेंद्रच्या संपूर्ण घराची झडती घेण्याचं ठरवलं. घराचा तपास करताना एक गोष्ट पोलिसांना अशी आढळली, ज्याचा कोणीही, कधीही विचार केला नसेल. पोलिसांनी बाथरुम पाहिलं आणि संशय बळावला. पोलिसांनी बाथरुमच्या लाद्या तोडण्याचा निर्णय घेतला. लाद्या फोडल्यानंतर आतील सिमेंट काढण्यात आलं. त्याखाली माती होती आणि पुढे जे आढळलं त्याने सर्वच हैराण झाले.

मागील ४५ दिवसांपासून पोलीस ज्या सुरेंद्र यांचा शोध घेत होते, त्या सुरेंद्र यांचा मृतदेह त्यांच्याच घरातील बाथरुममधील लाद्यांखाली आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आता पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Jio AI Glasses : आता चष्म्यातून करा UPI पेमेंट! जिओचा भन्नाट स्मार्ट ग्लासेस, वाचा डिटेल्स
CJP Protest : अभिजीत दिपके ताब्यात, आता अजिंक्य शिंदे करणार जंतरमंतरवर आंदोलनाचं नेतृत्व