
कोझिकोड: पश्चिम बंगालचा एक तरुण कामगार केरळमध्ये रोजगारासाठी आला होता, पण तिथे त्याचा दुर्दैवी अंत झाला. कोझिकोडमधील नरीक्कुनी येथे राहत्या खोलीत विजेचा धक्का लागून या तरुणाचा मृत्यू झाला आहे. नबिउल हसन (वय २१) असं या मृत तरुणाचं नाव आहे. तो मूळचा पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील हरिश्चंद्रपूर, सोनाकोल पोस्ट बागुआ येथील रहिवासी होता.
नबिउल हा नरीक्कुनी बस स्टँडजवळील 'सुलतान पॅलेस हॉटेल'मध्ये काम करत होता. तो नरीक्कुनी-पूनूर रोडवरील थेचोट्टू येथील एका इमारतीत भाड्याच्या खोलीत राहत होता. याच खोलीत त्याला विजेचा जोरदार धक्का लागला आणि त्यातच त्याचा जीव गेला. सध्या नबिउलचा मृतदेह कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे.