Viral Video: पुण्यात भरधाव रॉयल एनफिल्ड हिमालयन घसरली! (पाहा व्हिडिओ)

vivek panmand   | CMS
Published : Nov 22, 2026, 04:26 PM IST
Royal Enfield Rider Loses Control In Pune

सार

पुण्यात एका उड्डाणपुलाजवळ रॉयल एनफिल्ड हिमालयन चालवणाऱ्या तरुणाचा अचानक तोल गेला आणि बाईक घसरली. डॅशकॅममध्ये कैद झालेल्या या व्हिडिओत तो रस्यावर पडताना आणि इतर वाहनांपासून थोडक्यात वाचताना दिसतोय. या अपघातात त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

पुण्यात उड्डाणपुलाजवळ ओव्हरटेक करताना एका रॉयल एनफिल्ड हिमालयनस्वाराचा गाडीवरील ताबा सुटला. हा सर्व थरार एका गाडीच्या डॅशकॅममध्ये कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात २१ नोव्हेंबरला दुपारी १२:१० च्या सुमारास झाला. व्हिडिओमध्ये दिसतंय की, भरधाव वेगात असलेल्या या बाईकचं पुढचं चाक अचानक हलू लागतं. काही सेकंदातच चालकाचा कंट्रोल सुटतो आणि तो थेट रस्त्यावर आपटतो. बाईक आणि तो तरुण रस्त्याच्या डाव्या लेनवर काही मीटर फरफटत जातात. सुदैवाने, जवळून जाणाऱ्या एका स्कूटर आणि दुसऱ्या बाईकस्वाराला धडकण्यापासून तो थोडक्यात बचावतो.

रस्त्यावर फरफटत गेली बाईक, इतर प्रवासी थोडक्यात बचावले

उपलब्ध माहितीनुसार, रस्त्यावरील खड्ड्यामुळे किंवा उंचवट्यामुळे बाईकचं पुढचं चाक हलू लागलं होतं. या अचानक झालेल्या हालचालीमुळे त्या तरुणाचा तोल गेला आणि तो बाईकसह रस्त्यावर घसरला. आसपास इतरही दुचाकी असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती. पण सुदैवाने स्कूटरस्वार आणि दुसरा बाईकस्वार या अपघातातून वाचले. या तरुणाला किरकोळ दुखापत झाली असून, हेल्मेटमुळे त्याचा जीव वाचल्याचं बोललं जात आहे.

डॅशकॅमवाला आणि इतर प्रवाशांची धाव

या डॅशकॅम व्हिडिओमध्ये अपघातानंतरचा प्रसंगही पाहायला मिळतो. डॅशकॅम असलेला ड्रायव्हर आणि इतर प्रवासी या तरुणाच्या मदतीसाठी धावून जातात. या घटनेमुळे खराब रस्त्यांमुळे दुचाकीस्वारांना, विशेषत: भरधाव वेगात असलेल्यांना, किती धोका निर्माण होऊ शकतो हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. रस्त्याच्या स्थितीतील अचानक बदलामुळे बाईकचा तोल जाऊ शकतो आणि मोठे अपघात होऊ शकतात. म्हणूनच गाडी वेगमर्यादेत चालवा, ओव्हरटेक करताना सावध राहा आणि खराब रस्त्यांवर विशेष काळजी घ्या, असा धडा या घटनेतून मिळतो.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

AadityaThackeray | साताऱ्यातील अदानी प्रकल्पावर आदित्य ठाकरेंचा सवाल
Manipur Liquor Tragedy: मणिपूरमध्ये विषारी दारूमुळे १८ मृत्यू, हजार जणांवर रुग्णालयात उपचार