
मुंबई : भारतीय लग्नात सहभागी होणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं, नातेवाईकांना भेटणं आणि चांगल्या जेवणाचा आस्वाद घेणं, असं मानलं जातं. पण, एका व्हायरल सोशल मीडिया पोस्टने लग्नाचं आमंत्रण पाहुण्यांसाठी कसं आर्थिक ओझं बनू शकतं, याकडे लक्ष वेधले आहे. एका तरुणाने २०२६ मध्ये भारतीय लग्नाला उपस्थित राहण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा हिशेब मांडला आहे, ज्यात त्याने एका लग्नाचा खर्च सुमारे ५,००० रुपये असू शकतो असा दावा केला आहे. त्याच्या या पोस्टने इंटरनेट युजर्सचे लक्ष वेधून घेतले असून, लग्न आता महागडे होत असल्याच्या मुद्द्यावर अनेकांनी सहमती दर्शवली आहे.
ही पोस्ट अनूप (@ItsAnupX) नावाच्या युजरने एक्सवर शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने सामान्य पाहुण्याला करावा लागणारा खर्च नमूद केला आहे. त्याच्या हिशेबानुसार, कपड्यांवर २,००० रुपये, प्रवासासाठी १,५०० रुपये, भेटवस्तूंसाठी १,००० रुपये आणि चहापाणी व इतर किरकोळ खर्चासाठी ५०० रुपये खर्च येऊ शकतो.
येथे पाहा व्हायरल पोस्ट:
Attending an Indian wedding in 2026:
Spend ₹2,000 on clothes.
₹1,500 on travel.
₹1000 on gifts.
₹500 on chai Pani.
Stand in a queue for 40 minutes to take a photo with the couple.
Eat dinner while checking your phone because the next function starts tomorrow.
We don't attend weddings anymore.
We manage wedding expenses.
— Anup (@ItsAnupX) November 25, 2026
हा खर्च सांगताना अनूपने लिहिलं, "२०२६ मध्ये भारतीय लग्नाला हजेरी लावणे: कपड्यांवर २,००० रुपये, प्रवासावर १,५०० रुपये, भेटवस्तूंवर १,००० रुपये आणि चहापाण्यावर ५०० रुपये खर्च करा."
पण त्याचे निरीक्षण फक्त पैशांपुरते मर्यादित नव्हते. त्याने अनेक लग्न समारंभांना उपस्थित राहण्यासाठी लागणारा वेळ आणि प्रयत्नांकडेही लक्ष वेधले.
“नवरा-नवरीसोबत फोटो काढण्यासाठी ४० मिनिटे रांगेत उभे राहा. उद्या पुढचा कार्यक्रम सुरू होणार असल्यामुळे मोबाईल बघत रात्रीचं जेवण करा.”त्याने एका वाक्याने या पोस्टचा शेवट केला, जो युजर्सला खूप भावला: "आम्ही आता लग्नाला जात नाही. आम्ही लग्नाचा खर्च मॅनेज करतो." वाढत्या खर्चावर इंटरनेटची प्रतिक्रिया, या पोस्टमुळे सामाजिक अपेक्षा, आर्थिक दबाव आणि बदलत जाणाऱ्या लग्न पद्धतींवर चर्चा सुरू झाली आहे.
एका युजरने कमेंट केली, "सामाजिक दबाव खूप त्रासदायक आहे."
दुसऱ्या एका युजरने म्हटलं, "लग्न आता लग्नासारखी वाटत नाहीत." यावर उत्तर देताना अनूपने लिहिलं, "हो खरं आहे, निम्म्याहून अधिक वेळ ते कौटुंबिक संमेलनापेक्षा एखाद्या इव्हेंटसारखं वाटतं."
एका युजरने प्रतिक्रिया दिली, “भारतीय लग्नांमध्ये प्रेमाचा उत्सव कमी आणि बजेट, कपडे आणि सामाजिक बंधने मॅनेज करणे जास्त झाले आहे.”दुसऱ्या एका कमेंटमध्ये म्हटलंय, "लग्न म्हणजे आता मोफत जेवण देणारे आर्थिक प्रोजेक्ट झाले आहेत."
आणखी एका युजरने निदर्शनास आणून दिलं, "आपण नातेसंबंध साजरे करण्यापेक्षा लग्नाचं बजेट आणि वेळापत्रक मॅनेज करण्यात जास्त वेळ घालवतो. साध्या समारंभांचा आनंद आपण कुठेतरी गमावला आहे."
या चर्चेतून एक भावना दिसून येते की, लग्नाला उपस्थित राहणं म्हणजे आता केवळ आनंद लुटणं राहिलं नसून त्यात नियोजन, खर्च आणि सामाजिक बंधनांचा जास्त सहभाग आहे.