Viral Video: ट्रॅफिक पोलिसांना घाबरून पतीने पळवली बाईक, बायको रस्त्यावरच पडली!

vivek panmand   | CMS
Published : Oct 18, 2026, 05:39 PM IST
Viral Video: ट्रॅफिक पोलिसांना घाबरून पतीने पळवली बाईक, बायको रस्त्यावरच पडली!

सार

उत्तराखंडच्या रुद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ट्रॅफिक पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने भरधाव वेगात बाईक पळवली. यावेळी त्याची पत्नी गाडीवरून खाली पडली, पण तो तिला तिथेच सोडून पळून गेला.

उत्तराखंडच्या रुद्रपूरमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. ट्रॅफिक पोलिसांच्या चेकिंगपासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने आपली बाईक सुसाट पळवली. गाडीचा वेग अचानक वाढल्याने मागे बसलेली त्याची पत्नी रस्त्यावरच आपटली. त्रिशूल चौकात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे बेदरकारपणे गाडी चालवण्यावर आणि पोलिसांना चुकवण्याच्या प्रयत्नांवरून संताप व्यक्त केला जात आहे.

नंबर प्लेट नसलेली वाहने आणि हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू होती. यावेळी पोलिसांनी या दुचाकीस्वाराला थांबण्याचा इशारा दिला. पण थांबण्याऐवजी त्याने पोलिसांना चुकवण्यासाठी गाडीचा वेग वाढवला आणि अचानक गाडी वळवली.

नवऱ्याने अचानक गाडी वळवल्यामुळे मागे बसलेल्या त्याच्या पत्नीचा तोल गेला आणि ती थेट रस्त्यावर पडली. पण सर्वात धक्कादायक म्हणजे, बायको पडलीये हे पाहूनही तो थांबला नाही. तिची साधी विचारपूसही न करता त्याने तिथून पळ काढला.

तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. महिला खाली पडताच पोलिसांनी लगेच तिच्या मदतीसाठी धाव घेतली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर, ट्रॅफिक पोलिसांना चुकवण्याच्या नादात लोक स्वतःचा आणि इतरांचा जीव कसा धोक्यात घालतात, यावर चर्चा सुरू झाली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर पोलिसांनी त्या महिलेची विचारपूस केली. सुदैवाने तिला कोणतीही दुखापत झाली नव्हती. पोलिसांनी तिचे समुपदेशन केले आणि तिला सुखरूप घरी पाठवून दिले.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Sant Bhagwan Baba | सावरगाव घाटात पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची तयारी
Uttarakhand Nursing Jobs: उत्तराखंडमध्ये नर्सिंगच्या जागा वाढल्या, ७३ जणांना परदेशात नोकरी