UPSC 2024 टॉपर लिस्ट: शक्ती दुबे अव्वल, महाराष्ट्राच्या अर्चित डोंगरेचा देशात तिसरा क्रमांक

Published : Apr 22, 2025, 05:09 PM IST
UPSC CSE Result

सार

UPSC CSE 2024 च्या निकालात शक्ती दुबे, हर्षिता गोयल आणि अर्चित डोंगरे यांनी देशभरात आपले नाव कोरले आहे. पुण्याच्या अर्चित डोंगरेने तिसरा क्रमांक मिळवत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.

UPSC CSE 2024 निकाल अखेर जाहीर झाला आहे आणि यावर्षीही देशातील सर्वोच्च स्पर्धा परीक्षेत मेहनतीच्या जोरावर अनेकांनी यशाचे शिखर गाठले आहे. यंदाच्या निकालात तीन नावं देशभरात चर्चेचा विषय ठरली आहेत. शक्ती दुबे, हर्षिता गोयल, आणि अर्चित डोंगरे.

देशात पहिली, वाराणसीची शक्ती दुबे!

उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून आलेली शक्ती दुबे हिने यावर्षीचा UPSC CSE 2024 टॉपर होण्याचा मान मिळवला आहे. संपूर्ण देशातून लाखो विद्यार्थ्यांमध्ये पहिला क्रमांक मिळवणं हे फक्त यशच नाही, तर ती तिच्या समर्पणाची, जिद्दीची आणि अथक मेहनतीची झलक आहे.

 

 

दुसऱ्या स्थानावर, हरियाणाची हर्षिता गोयल

हरियाणामधील हर्षिता गोयल हिने दुसरा क्रमांक मिळवत आपल्या राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या यशामध्ये दिसते ती एक ठाम दिशा, जिथे ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रत्येक दिवस लावून दिला जातो.

तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा अभिमान, अर्चित डोंगरे

आता या यादीत सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या नावाकडे वळूया, अर्चित पराग डोंगरे. पुण्याचा हा तरुण देशात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे आणि खरं सांगायचं तर, त्याची कहाणी ही केवळ यशाची नव्हे, ती सातत्याची आणि आत्मविश्वासाची कहाणी आहे.

कोण आहे अर्चित डोंगरे?

अर्चित मूळचा पुण्याचा. शालेय शिक्षण त्याने मुंबईत घेतलं. त्यानंतर वेल्लोरच्या नामवंत VIT विद्यापीठातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरिंगमध्ये B.Tech पूर्ण केलं. शिक्षण संपल्यावर एक वर्ष एका IT कंपनीत काम केलं. पण त्याला ठाऊक होतं. त्याचं खऱ्या अर्थाने "करिअर" हे देशसेवेच्या वाटेवरच आहे.

 

 

सतत प्रयत्न, अखेरचा विजय

हे लक्षात घ्या, अर्चित यासाठी आधीही लढलेला आहे. 2023 मध्ये त्याने 153 वा क्रमांक मिळवला होता, पण त्याला एवढ्यावर समाधान नव्हतं. पुन्हा अभ्यास सुरु झाला. अधिक नियोजन, अधिक खोलात जाऊन समजून घेणं, आणि पुन्हा प्रयत्न!

आज, 2024 मध्ये त्याचं स्वप्न साकार झालं, देशात तिसऱ्या क्रमांकासह!

UPSC CSE 2024 मध्ये एकूण 1,009 उमेदवारांची निवड

या वर्षी IAS, IFS, IPS आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये निवड होण्यासाठी एकूण 1,009 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत या तीन टप्प्यांतून यशस्वीरित्या पार पडलेल्या उमेदवारांचा निकाल UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर (https://upsc.gov.in/) पाहता येईल.

अर्चित डोंगरे, महाराष्ट्रातील नव्या पिढीचा रोल मॉडेल

आज अर्चित डोंगरेचं नाव घेताना हजारो तरुणांच्या डोळ्यांत आशेची नवी चमक निर्माण होते. त्याचं यश हे केवळ त्याचं नसून, ते प्रत्येक त्या विद्यार्थ्याचं आहे जो स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवतो.

यश हे एक दिवसात मिळत नाही, पण रोजच्या प्रयत्नांतून घडतं!

UPSC सारखी परीक्षा ही परीक्षेपेक्षा एक प्रवास आहे. स्वतःशी झालेल्या शर्थीच्या लढाईचा. अर्चित, शक्ती, आणि हर्षिता यांनी आपापल्या प्रवासात हे दाखवून दिलं की चिकाटी, समर्पण आणि संयम यांच्याच जोरावर सर्वोच्च शिखर गाठता येतं.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या IndiGo वर कठोर कारवाई होणार, सरकारचा संसदेत इशारा!
कॅब ड्रायव्हर आणि त्याच्या मित्रांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार, तपासात मात्र मोठा ट्विस्ट उघडकीस!