लव्ह जिहादचे रॅकेट, जिममध्ये श्रीमंत महिला टार्गेट, वर्गमैत्रिणींनी घालायला लावला बुरखा

Published : Jan 25, 2026, 08:16 AM IST
UP Gym Conversion Racket Busted

सार

UP Gym Conversion Racket Busted : श्रीमंत महिलांना लक्ष्य करून जिमद्वारे धर्मांतर आणि पैसे उकळणाऱ्या विदेशी संबंध असलेल्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 

UP Gym Conversion Racket Busted : श्रीमंत कुटुंबातील महिलांना मोफत प्रशिक्षणाच्या नावाखाली जिमला बोलावून नंतर त्यांचे धर्मांतर करणे आणि त्यांच्यासोबतचे खासगी क्षण वापरून पैसे उकळणाऱ्या एका रॅकेटचा यूपी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटचे परदेशातही लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिर्झापूरमध्ये एक टोळी जिमच्या माध्यमातून फसवणूक करत असल्याची तक्रार एका महिलेने पोलिसांना फोनवरून दिली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मोहम्मद शेख अली नावाच्या मुख्य आरोपीला अटक केली. त्याचा मोबाईल तपासला असता, त्याने KGN1, KGN2.0, KGN3, आयर्न फायर आणि फिटनेस क्लब यांसारखे जिम सुरू केल्याचे उघड झाले. 

पोलिस कर्मचाऱ्यासह ६ जणांना अटक

त्याच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्याचेही आढळून आले आहे. तसेच, एका आरोपीच्या मोबाईलमध्ये ५० हून अधिक महिलांचे फोटो सापडले आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिस कर्मचारी शाबादसह ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

इम्रान खान नावाच्या दुसऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर तो दुबई आणि मलेशियाला जाऊन आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या फसवणुकीच्या रॅकेटला परदेशातूनही पैसा आणि इतर मदत मिळत असल्याचा संशय आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

वर्गमैत्रिणीच्या धर्मांतरासाठी ५ अल्पवयीन मुस्लिम मुलींचा प्रयत्न, गुन्हा दाखल

मुरादाबाद : वर्गमैत्रिणीला बुरखा घालण्यास आणि धर्मांतर करण्यास ५ अल्पवयीन मुस्लिम मुलींनी भाग पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून धर्मांतर विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गेल्या दि. १२ रोजी चित्रित झालेल्या व्हिडिओमध्ये एक हिंदू मुलगी बुरखा घातलेली दिसत असून, ५ मुस्लिम मुली तो नीट करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, 'माझ्या बहिणीच्या वर्गमैत्रिणी असलेल्या त्या पाच जणी तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होत्या,' असा आरोप दक्ष चौधरी यांनी केला होता. 

२०२१ च्या बेकायदेशीर धर्मांतरण प्रतिबंध कायद्याच्या कलम ३ आणि ५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 'त्या सर्वजणी हॉटेलमध्ये जात होत्या आणि आपल्या भावाने पाहू नये म्हणून तिने बुरखा घातला असावा,' असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

30 रुपयांचा चहा पडला 30 लाखांना, सॉफ्टवेअर इंजिनिअर कपलने गमावले सर्व दागिने
Union Budget 2026: जागतिक अस्थिरता आणि अर्थमंत्र्यांपुढील आव्हाने तसेच अपेक्षा