
18 Year Old Marries Her 55 Year Old Brother In Law : बहिणीची तब्येत बरी नव्हती, तिच्या काळजीसाठी म्हणून बहीण तिच्या घरी जात असे. बहिणीला पाहण्याऐवजी तिने दाजींना पाहिले. बस, ५५ वर्षांच्या दाजींच्या प्रेमात ती पडली. बोलता-बोलता दोघांमध्ये प्रेम झाले. आता लग्न करून, समाज काहीही म्हणो, आम्हाला पर्वा नाही, आमच्यासाठी प्रेम (Love) महत्त्वाचे आहे, असे ते म्हणत आहेत.
हे लग्न उत्तर प्रदेशातील एका गावात झाले आहे. १८ वर्षांच्या मुलीने आपल्या बहिणीचा पती, ५५ वर्षांच्या दाजींशी लग्न केले आहे. 'बहिणीची तब्येत बरी नसायची. मी तिच्या घरी सारखी जायचे. बहिणीच्या घरी स्वयंपाक करण्याची जबाबदारी माझी होती. तिथे दाजी माझ्याशी जास्त बोलू लागले. आम्ही हळूहळू जवळ आलो. आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो. ही गोष्ट घरच्यांना सांगून आम्ही लग्न केले,' असे ती मुलगी म्हणाली. गुलाबी साडी नेसून माध्यमांसमोर आलेल्या नववधूने समाजाची पर्वा करणार नाही, असे म्हटले आहे. 'आमच्यासाठी प्रेम महत्त्वाचे आहे. समाज आमच्याबद्दल काहीही बोलला तरी आम्ही पर्वा करणार नाही,' असे ती म्हणाली.
पांढरे केस आणि दाढी असलेल्या दाजींनीही मेहुणीला पूर्णपणे स्वीकारले आहे. 'हे लग्न दोघांच्या संमतीने झाले आहे. मुलीच्या किंवा माझ्या दबावाखाली हे लग्न झालेले नाही,' असे त्याने सांगितले. माध्यमांनी 'वृद्ध' म्हटल्यावर तो व्यक्ती संतापला आणि म्हणाला, 'तुम्ही मला म्हातारा म्हटल्यावर वाईट वाटते.' त्याच्या या बोलण्याला नवीन पत्नीनेही साथ दिली. हसून, पतीची बाजू घेत नववधू म्हणाली, 'माझ्या नजरेतून पाहिल्यास ते म्हातारे नाहीत. फक्त केस पांढरे झाले आहेत. हेअर डाय केल्यावर ते काळे होतील. दात पांढरे होतील. ते सुंदर आणि हुशार आहेत,' असे म्हणत मुलीने पतीचे कौतुक केले.
सोशल मीडियावर या नवीन जोडप्याची बातमी व्हायरल झाली आहे. लोकांनी कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. 'या प्रेमाला विरोध करण्याचा कोणालाही हक्क नाही. प्रेमासाठी वय महत्त्वाचे नाही, एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे,' अशी एकाने कमेंट केली आहे. तर काही लोकांनी याला विरोध केला आहे. 'वयातील अंतर भविष्यात समस्या निर्माण करू शकते,' असे ते म्हणाले. 'दाजींनी निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, पहिली पत्नी आजारी असल्याने त्याने दुसरीला जाळ्यात ओढले आहे,' अशीही कमेंट केली आहे. 'बहिणीचे काय झाले?' हा प्रश्न वापरकर्त्यांना पडला आहे. बहिणीने या लग्नाला संमती दिली का, तिची तब्येत आता बरी आहे का, हे मुलीने स्पष्ट केलेले नाही. व्हिडिओमध्ये या जोडप्याचे मूळ गाव सांगितलेले नाही. पण त्यांची भाषा ऐकून ते उत्तर प्रदेशचे असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे.