
उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली असून तिथं पर्यटक अडकून पडले आहेत. येथे महाराष्ट्रातील २०० पर्यटक असून ५० मुंबईतील आहेत. हिमाचल आणि उत्तराखंड राज्यांमधील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले असून गाड्या वाहून गेल्या, काही घरांमध्ये पाणी शिरलं असून काही बंगले कोसळून पडले आहेत.
यमनोत्रीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. पावसाने अक्षरशः हाहाकार झाला असून त्यामुळे मुसळधार पावसात यात्रेकरू अडकून पडले आहेत. या राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पर्यटक अडकून पडले आहेत. अडकलेल्या पर्यटकांना रेस्क्यू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
अतिवृष्टीमुळे झाल्यामुळे स्थानिक लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांना सर्वोतोपरी मदत पोहचवण्याचं प्रयत्न केले जात आहेत. काही पर्यटकांची अजूनही माहिती समजली नसून त्यांच्यापर्यटन पोहचण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यांचा बचाव करण्यासाठी रेस्क्यू टीमला पाठवण्यात आले आहे.