Tirupati Temple Donation: तिरुपती मंदिरात भक्ताने दिलं 121 किलो सोनं, 9 सेटमध्ये 45 डिझायनर दागिने

vivek panmand   | CMS
Published : Nov 26, 2026, 07:59 PM IST
tirupati

सार

चेन्नईचे रहिवासी वर्धमान जैन यांनी तिरुपती मंदिरात 121 किलो सोन्याचे दागिने दान केले आहेत. 9 सेटमध्ये 45 दागिने त्यांनी अर्पण केले आहेत.

तिरुपती: तिरुपती मंदिरात एका भक्ताने मोठी देणगी दिली आहे. या भक्ताने 121 किलो सोन्याचे दागिने दान म्हणून दिले आहेत. मंदिराच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वैयक्तिक देणगी आहे. चेन्नईचे रहिवासी वर्धमान जैन यांनी हे दान केलं आहे. 9 सेटमध्ये 45 दागिने त्यांनी अर्पण केले आहेत. या दागिन्यांची अंदाजे किंमत 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. देणगीची माहिती समोर आली होती, पण जैन यांचं नाव सुरुवातीला गुप्त ठेवण्यात आलं होतं.

किती दिली देणगी?

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्या उपस्थितीत ही देणगी देण्यात आली. मूर्तीसाठी खास डिझाइन केलेले हे दागिने असल्याचं राष्ट्रीय माध्यमांनी सांगितलं आहे. यामध्ये श्रीवरी मुकुट, पद्म पदालु यासारख्या दागिन्यांचा समावेश आहे. चेन्नईतील जीआरटी ज्वेलर्सने हे दागिने बनवले आहेत. ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यांनीच कडक सुरक्षेत हे दागिने तिरुपतीला पोहोचवले. शुक्रवारपासून मूर्तीला हे नवीन दागिने घातले जातील, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Chandrashekhar Bawankule | अनधिकृत फ्लॅटला प्रॉपर्टी कार्ड मिळणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे
Bawankule | पुर्नविकासानंतरही मिळणार प्रॉपर्टी कार्ड, बिल्डरच्या नोंदींवरही प्रॉपर्टी कार्ड