
पुणे, २८ मे २०२५: मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले होते. मात्र, आता पावसाचा जोर ओसरत असून, हवामान विभागाने पुण्यासाठी दिलेला 'ऑरेंज अलर्ट' कमी करून 'येलो अलर्ट' जारी केला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तथापि, कोल्हापूरमधील घाटमाथ्यांवर अजूनही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावल्यामुळे, काही भागांत अतिवृष्टी झाली आहे. महाराष्ट्रात १९ मेपासून सुरू झालेल्या पावसामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी १० मृत्यू मागील २४ तासांत झाले आहेत. पुणे शहरात सध्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांतही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.