Golden Lanka : रावणाला सोन्याची लंका कोणी दिली होती? या मागची गोष्ट नक्की वाचा

Published : Oct 22, 2026, 11:43 AM IST

दसऱ्याच्या निमित्ताने रावण दहनाचे कार्यक्रम सगळीकडे पार पडतात. पण, रामायणातील रावणाची लंका ही अतिशय भव्य आणि श्रीमंत होती. म्हणूनच तिला 'सोन्याची लंका' म्हटलं जायचं. पण रावणाला ही सोन्याची लंका नेमकी कशी मिळाली? ती त्याला कोणी गिफ्ट दिली होती?

PREV
14
लंकेबद्दलच्या दोन प्रसिद्ध कथा

पुराणांमध्ये सोन्याच्या लंकेबद्दल दोन कथा खूप प्रसिद्ध आहेत. पहिली कथा भगवान शिव आणि माता पार्वतीशी जोडलेली आहे. यात लंकेची भव्य निर्मिती आणि रावणाची एन्ट्री कशी झाली हे सांगितलंय. तर दुसरी कथा रावणाचा सावत्र भाऊ कुबेराशी संबंधित आहे. कुबेराचे लंकेवर आणि पुष्पक विमानावर नियंत्रण होते.

24
शिव-पार्वतीसाठी बनवली सोन्याची लंका

पौराणिक कथेनुसार, एकदा माता पार्वतीने भगवान शिवाला राहण्यासाठी एक भव्य राजवाडा बांधण्याची इच्छा बोलून दाखवली. तेव्हा शिवाने देवांचे वास्तुविशारद विश्वकर्मा यांना एक सुंदर राजवाडा बांधण्याची जबाबदारी दिली. विश्वकर्माने समुद्राच्या मध्यभागी एक भव्य नगर वसवले. हे नगर पूर्णपणे सोन्याने मढवलेले होते. म्हणूनच पुढे ते 'सोन्याची लंका' म्हणून प्रसिद्ध झाले.

34
रावणाने लंका कशी मिळवली?

या भव्य राजवाड्याच्या गृहप्रवेशासाठी रावणालाही बोलावण्यात आले होते. रावण हा मोठा विद्वान आणि शिवभक्त होता. त्यानेच गृहप्रवेशाची पूजा केली. पण लंकेचे सौंदर्य पाहून रावण इतका भारावून गेला की त्याने दक्षिणा म्हणून शिवाकडे ही सोन्याची लंकाच मागितली. शिवानेही आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण केली आणि लंका रावणाच्या ताब्यात दिली. या घटनेमुळे माता पार्वती खूप संतापली आणि तिने लंकेला शाप दिला.

44
कुबेर आणि लंकेची दुसरी कथा

सोन्याच्या लंकेची दुसरी कथा रावण आणि त्याचा भाऊ कुबेर यांच्याशी जोडलेली आहे. रामायणानुसार, कुबेर हा ऋषी विश्रवा यांचा मुलगा आणि रावणाचा सावत्र भाऊ होता. कुबेर हा संपत्तीचा देव मानला जातो. सुरुवातीला कुबेरच लंकेवर राज्य करत होता. त्याच्याकडेच पुष्पक विमान होते. पण रावणाने कठोर तपश्चर्या करून ताकद मिळवली आणि राज्य वाढवण्याची इच्छा धरली. त्याने युद्धात कुबेराचा पराभव केला आणि लंकेवर ताबा मिळवला. सोबतच पुष्पक विमानही बळकावले.

रावणाच्या काळात लंका खूप शक्तिशाली बनली. हनुमान जेव्हा सीतेच्या शोधात लंकेत गेले, तेव्हा तिथले राजवाडे आणि संपत्ती पाहून तेही थक्क झाले होते. पण सीतेच्या अपहरणाने लंकेचा संपूर्ण इतिहासच बदलून टाकला.

India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories