Terrorist attack in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला, 2 चकमकीत 6 दहशतवादी ठार तर 2 जवान शहीद

Terrorist attack in Jammu and Kashmir : यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत लष्कराचे 2 जवान शहीद झाले. तर लष्कराने 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

Terrorist attack in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. मंजकोट भागातील ग्लुटी गावात लष्कराच्या चौकीवर तैनात असलेल्या जवानावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान जखमी झाला. या गोळीबारादरम्यान सुरक्षा चौकीवर तैनात असलेल्या जवानांनी दहशतवाद्यांवर गोळीबार केला.

रविवारी पहाटे 3.50 वाजता ही घटना घडली. अंधाराचा फायदा घेत दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. याबाबत लष्कराकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

लष्कराने 6 दहशतवाद्यांचा केला खात्मा

यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तर लष्कराने 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यापूर्वी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यानंतर लष्कराने दहशतवादविरोधी अभियान सुरू केले. यावेळी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, जिल्ह्यातील फ्रिसल चिन्निगाम भागात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली.

जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडेच अनेक दहशतवादी घटना समोर आल्या आहेत. यापूर्वी 27 जूनला जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील गंडोह, भदरवाह सेक्टरमध्ये बुधवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. गेल्या महिन्यात 9 जूनच्या संध्याकाळी जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर यात्रेकरूंनी भरलेली बस खड्ड्यात पडली, त्यात किमान 9 जण ठार आणि 33 जण जखमी झाले.

आणखी वाचा :

Jagannath Rath yatra 2024: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भगवान जगन्नाथ रथयात्रेत सहभागी होणार, जगभरातून भाविक येणार

 

Share this article