
Chhattisgarh accident : छत्तीसगडमधील रायपूर-बलोदाबाजार रस्त्यावरील सारगाव जवळ एका ट्रकची ट्रेलरशी टक्कर झाल्यामुळे किमान दहा जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. रायपूरचे पोलीस अधीक्षक लाल उम्मेद सिंग यांनी सांगितले की, चौथिया छट्टी येथील एका कार्यक्रमातून परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रायपूरच्या डॉ. बी.आर. आंबेडकर स्मारक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे.