टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहली रेस्टॉरंट चालवतो. दिल्लीसह हैदराबादमध्येही त्याचे हॉटेल आहे. तिथे विकल्या जाणाऱ्या एका प्लेट मक्याच्या भुट्ट्याची किंमत पाहून एका विद्यार्थिनीला धक्का बसला. तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
बँक खात्यात (Bank account) जास्त पैसे असतील तरच आलिशान हॉटेलमध्ये (luxury hotel) जावे. तिथे जेवणापेक्षा आलिशान सुविधांना जास्त प्राधान्य दिले जाते. म्हणूनच जेवणाची किंमत दुप्पट असते. आता टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहली (Team India player Virat Kohli) याचे रेस्टॉरंट चर्चेत आले आहे. तिथल्या जेवणाच्या किमतीबद्दल एका तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. हे विराट कोहलीचे रेस्टॉरंट असल्याने ते आणखीनच चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू आहे.
हैदराबादमधील इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या विद्यार्थिनीने पोस्ट शेअर केली आहे. विराट कोहलीच्या मालकीच्या वन८ कम्यून (One8 commune) रेस्टॉरंटमध्ये ती गेली होती. तिथे तिने एक प्लेट मक्याचा भुट्टा (corn bhutta) मागवला. त्या भुट्ट्याची किंमत ५२५ रुपये होती. पण आलेला ऑर्डर पाहून तिला धक्का बसला. ५२५ रुपयांना प्लेट भरून मका येईल असे तिला वाटले होते. पण आले मात्र फक्त चार तुकडे, असे तिने लिहिले आहे.
स्नेहा नावाच्या एक्स अकाउंटवर मक्याच्या प्लेटसह फोटो शेअर करण्यात आला आहे. वन८ कम्यूनमध्ये या एका प्लेटसाठी ५२५ रुपये दिले, असे तिने लिहिले आहे. ही पोस्ट एक लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. हजारो लोकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी स्नेहाला ट्रोल केले तर काहींनी हॉटेलबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. इथे तुम्ही जेवणासाठी पैसे दिले नाहीत. तिथल्या सुविधा, वातावरणासाठी पैसे दिले आहेत, असे एकाने कमेंट केली आहे. तिथल्या वातावरणामुळे जेवणाची किंमत जास्त आहे, असे दुसऱ्याने लिहिले आहे. मक्याच्या एका प्लेटची किंमत मेनूमध्ये किती होती? ते महाग आहे हे तुम्हाला माहीत होते. मग ते का मागवले, असे आणखी एकाने लिहिले आहे. एका प्लेटसाठी एवढे पैसे खर्च केल्यावर लाज वाटते. ते इतरांसमोर सांगताही येत नाही, असे एका युजरने लिहिले आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर किंमत पाहून ऑर्डर करावी, असा सल्ला काहींनी स्नेहाला दिला आहे. कोहली निवृत्तीनंतर पैसे कमविण्यासाठी रेस्टॉरंट सुरू केले आहे, अशी कमेंट एका युजरने केली आहे.
टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहली क्रिकेट, जाहिरातींसोबत अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यात रेस्टॉरंट चेनचाही समावेश आहे. वन८ कम्यून हे त्याचे प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. दिल्ली आणि मुंबईनंतर गेल्या वर्षी कोहलीने हैदराबादमध्ये रेस्टॉरंट सुरू केले. हे हॉटेल खूप आलिशान आहे. इंटिरियरवर कोहलीने भरपूर पैसे खर्च केले आहेत. दिल्लीत दोव रेस्टॉरंट आहेत, गुरुग्राममध्येही कोहलीने एक रेस्टॉरंट सुरू केले आहे.