T20 World Cup 2024 Ind Vs Pak: पाकिस्तानी संघ भारताचे 120 धावांचे लक्ष्य गाठू शकला नाही, सहा धावांनी पराभूत

Published : Jun 10, 2024, 05:33 AM ISTUpdated : Jun 10, 2024, 02:52 PM IST
T20 World Cup 2024

सार

T20 World Cup 2024 Ind Vs Pak: T20 विश्वचषक 2024 चा बहुप्रतिक्षित सामना रविवारी न्यूयॉर्क शहरात खेळला गेला. 

T20 World Cup 2024 Ind Vs Pak: T20 World Cup 2024 चा सर्वात रोमांचक सामना रविवारी न्यूयॉर्क शहरात खेळला गेला. भारतीय फलंदाजांच्या अत्यंत खराब कामगिरीनंतरही गोलंदाजांनी सहज विजय मिळवून दिला. पाकिस्तान संघाला 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. 20 षटकांच्या अखेरीस पाकिस्तानी फलंदाज 7 विकेट गमावून केवळ 113 धावा करू शकले. भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्वात चुरशीचा सामना रविवार 9 जूनला झाला. मात्र, पावसामुळे सामना नियोजित वेळेपेक्षा 50 मिनिटे उशिरा सुरू झाला. नाणेफेकीनंतर पाकिस्तान संघाच्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब होती. प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण संघ 119 धावांत ऑलआऊट झाला. पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्यांनी दोन गडी गमावून 50 धावा केल्या, पुढच्या 13 षटकात त्यांनी केवळ 69 धावा केल्या आणि 8 विकेट गमावल्या. सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात परतले. शर्माने 13 तर कोहलीने 4 धावा केल्या. पहिली विकेट पडल्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने डावाची धुरा सांभाळली. पंतने 31 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. ऋषभ पंतला बाबर आझमच्या हातून मोहम्मद अमीरने झेलबाद केले. अक्षर पटेलनेही 20 धावांचे योगदान दिले. मात्र या दोघांनंतर आलेल्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. सूर्य कुमार यादवने 7 आणि शिवम दुबेने 3 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 7 धावा केल्या तर रवींद्र जडेजाने खातेही उघडले नाही. अर्शदीप सिंग 9 धावांवर धावबाद झाला. जसप्रीत बुमराहलाही खाते उघडता आले नाही. मोहम्मद सिराजने 7 धावा केल्या. संपूर्ण संघ 119 धावांवर बाद झाला. नसीम शाह आणि हरिस रौफने प्रत्येकी 3, मोहम्मद अमीरला 2 आणि शाहीन आफ्रिदीला एक विकेट मिळाली.

पाकिस्तानची सुरुवात चांगली आहे पण...

भारतीय संघाने दिलेले 120 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी पाकिस्तानच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. मोहम्मद रिझवानने 31 तर बाबर आझमने 13 धावा केल्या. उस्मान खान, फखर जमान यांनीही प्रत्येकी 13 धावांचे योगदान दिले. इमाद वसीमने 12 आणि शादाब खानने 4 धावा केल्या. इफ्तिखार खाननेही 5 धावा केल्या. 20 षटकांअखेर पाकिस्तानने 7 गडी गमावून केवळ 113 धावा केल्या. पाकिस्तान संघाला सहा धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. जसप्रीत बुमराहने 3 आणि हार्दिक पांड्याने 2 विकेट घेतल्या तर अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंगला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या IndiGo वर कठोर कारवाई होणार, सरकारचा संसदेत इशारा!
कॅब ड्रायव्हर आणि त्याच्या मित्रांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार, तपासात मात्र मोठा ट्विस्ट उघडकीस!