Sonam Wangchuk : सोनम वांगचुक रुग्णालयात, पोलिसांचा कडक बंदोबस्त; परवानगीशिवाय उपचार केले जाऊ नयेत, पत्नीची विनंती

Published : Jul 19, 2026, 11:09 AM IST
Sonam Wangchuk in Hospital

सार

Sonam Wangchuk Hospitalized : सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची तब्येत बरी असल्याची माहिती त्यांच्या पत्नीकडून देण्यात आली आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त रुग्णालयाबाहेर ठेवण्यात आला आहे.

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना काल शनिवारी त्यांच्या जंतरमंतर येथील उपोषण स्थळावरुन हलवण्यात आलं. काल त्यांचा उपोषणाचा २१वा दिवस होता. त्यांना उपोषणाच्या २१व्या दिवशी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील ८व्या मजल्यावरील खोलीत ते दाखल आहेत..

या रुग्णालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन बस भरुन सीआरपीएफच्या जवानांचं पथक रुग्णालयाबाहेर आहे. सोनम यांना ८व्या मजल्यावर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यापर्यंत सहजासहजी कोणालाही पोहोचता येणार नाही. रुग्णालयातील लिफ्ट आठव्या मजल्यापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. लिफ्ट आठव्या मजल्यावर थांबत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनम यांची तब्येत बरी आहे. सोनम यांच्या पत्नी गितांजली यांनीही त्यांची तब्येत पूर्णपणे बरी असल्याचं म्हटलं आहे. मात्र सतत विनंती करुनही रुग्णालयाकडून सोनम यांचा वैद्यकीय अहवाल मिळत नसल्याचं सोनम यांच्या पत्नी गितांजली यांनी सांगितलं आहे. त्यांनी पुढे बोलताना रुग्णालयावर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं, की रुग्णालयाच्या कारभारामध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. तसंच सोनम यांची परवानगी असल्याशिवाय त्यांच्यार कोणतेही उपचार केले जाऊ नयेत. तसंच त्यांना कोणतंही औषध दिलं जाऊ नये.

२० जुलै रोजी होणारा संसद मोर्चा ठरल्याप्रमाणे पार पडेल. तसंच या मोर्चामध्ये सोनम देखील सहभागी होतील, असंही गितांजली यांनी सांगितलं आहे. तसंच सोनम वांगचुक यांना रुग्णालयातून सोडण्याची मागणीही त्यांच्या पत्नी गितांजली यांनी केली आहे.

दरम्यान, आज रविवारी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा २२वा दिवस आहे. २८ जूनपासून ते अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. इतके दिवस अन्नाशिवाय असल्याने वांगचुक यांचं शरीर अतिशय कमकुवत झालं आहं. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी वांगचुक यांची तब्येत पाहून अतिशय भावूक होत, त्यांची हाडं दिसत असून ते चालू-फिऱू शकत नसल्याचं सांगितलं आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Gold Reserves : जगात सर्वाधिक सोनं असलेल्या टॉप १० देशांची यादी, भारत कितव्या नंबरवर?
Petrol Diesel Price : आजचे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, पाहा दिल्ली-मुंबईसह तुमच्या शहरातील इंधनाचे भाव