Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे, जे.पी. नड्डांसोबतच्या मिटिंगनंतर २३ दिवसांनी अन्नत्याग उपोषण सोडलं

Published : Jul 20, 2026, 07:33 PM IST
Sonam Wangchuk

सार

Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक यांनी तब्बल २३ दिवसांनी अन्नत्याग उपोषण मागे घेतलं आहे. जे.पी. नड्डा यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर हे उपोषण सोडलं आहे.

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मागील २३ दिवसांपासून सोनम अन्नत्याग उपोषणावर होते. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि इतर शैक्षणिक मागण्यांसाठी सोनम उपोषण केलं होतं. मात्र आज कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री जे.पी नड्डा यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर सोनम यांनी आपलं अन्नत्याग उपोषण मागे घेतलं आहे.

सोनम वांगचुक यांनी २३ दिवसांनी उपोषण सोडलं

सोनम वांगचुक मागील २३ दिवसांपासून अन्नत्याग उपोषणाला बसले होते. त्यांनी २८ जूनपासून दिल्लीतील जंतरमंतर इथे उपोषण सुरू केलं होतं. अखेर आज २० जुलै रोजी सरकारसोबत कॉकरोच जनता पार्टीची चर्चा झाल्यानंतर सोनम यांनी उपोषण सोडल्याचं सांगितलं आहे.

अन्नत्याग आंदोलनामुळे वांगचुक यांच्या तब्येतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यांना नीट चालताही येत नाही. दररोज त्यांची डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी केली जात होती. त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना १८ जुलै रोजी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झालं होतं. तसंच पोटॅशियमची पातळी अत्यंत कमी झाली होती. त्यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली होती. त्यांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सरकारी रुग्णालयावर सोनम यांच्या पत्नी गितांजली यांचे आरोप

सोनम यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या पत्नी गितांजली यांनी रुग्णालयावर आरोप केले होते. सोनम यांना खासगी रुग्णालयात हलवावं, आपला या रुग्णालयावर विश्वास नसल्याचं म्हणत सोनम यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

त्यानंतर आज २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा नेण्यात आला. हजोरांच्या संख्येत आलेल्या मोर्चादरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तसंच जे.पी. नड्डा यांच्याशी कॉकरोच पार्टीच्या सदस्यांशीही चर्चा झाली. त्यानंतर सोनम यांनी आपलं उपोषण सोडलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

आनंद दुबे यांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली | NEET | DelhiProtest | Resignation
Sonam Wangchuk : दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश