काय सांगता! शिखर धवनने खरेदी केला एवढ्या कोटींचा फ्लॅट, किंमत ऐकून व्हाल हैराण

Published : May 22, 2025, 08:55 AM IST
Shikhar dhawan

सार

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनने अलीकडेच तो रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले. यानंतर आता शिखरने कोट्यावधी रुपयांचा आलिशान फ्लॅट खरेदी केल्याची चर्चा आहे. 

Shikhar Dhawan Flat : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर शिखरने आयुष्याची दुसरी इनिंग सुरु केली आहे. सध्या तो आयर्लंडमध्ये जन्मलेल्या सोफी शाइनच्या प्रेमात असून, या नात्याची अधिकृत घोषणा दोघांनी सोशल मीडियावर केली आहे.

सोफी शाइनने इंस्टाग्रामवर धवनसोबतचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे या दोघांच्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून लवकरच ते विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.या पार्श्वभूमीवर शिखर धवनने आपल्या प्रेयसीसाठी एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. गुरुग्राममधील डीएलएफ ‘द डहलियास’ या सुपर लक्झरी निवासी प्रकल्पातील हा फ्लॅट आहे. गोल्फ कोर्स रोडवर असलेला हा प्रकल्प अत्यंत उच्चभ्रू आहे. सीआरई मॅट्रिक्स या रिअल इस्टेट डेटा फर्मनुसार, धवनने 4 फेब्रुवारी 2025 रोजी हा करार केला.

या फ्लॅटचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे एकूण क्षेत्रफळ 6040 चौरस फूट असून, त्याची खरेदी किंमत 65.61 कोटी रुपये आहे. याशिवाय 3.28 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरली गेल्याने एकूण खर्च जवळपास 69 कोटी रुपये झाला आहे.‘द डहलियास’ प्रकल्पामध्ये 420 अपार्टमेंट्स आणि पेंटहाऊसचा समावेश असून तो डीएलएफ फेज 5 मधील 17 एकर परिसरात विस्तारलेला आहे.

शिखर धवन आणि सोफी शाइन प्रथम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान एकत्र दिसले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू झाली.सोफी शाइन सध्या अबू धाबीमधील नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशनमध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. दुसरीकडे, धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो विविध लीग्समध्ये खेळत आहे.

धवनचे पहिले लग्न आयेशा मुखर्जीसोबत झाले होते. 11 वर्षांच्या लग्नानंतर ऑक्टोबर 2023 ते दोघे विभक्त झाले. त्यावेळी धवनला पत्नीमुळे मानसिक त्रास होत असल्याचे सांगितले गेले. याशिवाय शिखरने मुलगा जोरावरला आपल्यापासून दूर केल्याचे दुःखही व्यक्त केले होते.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department