Shameful: 10 वंदे भारत ट्रेनच्या खर्चात केली जातेय थुंकलेल्या गुटख्याची साफसफाई!

Published : Dec 26, 2025, 03:39 PM IST
Shameful

सार

Shameful : आम्हा भारतीयांत शिस्तीचा अभाव आहे. म्हणूनच, प्रवाशांनी पान मसाला आणि गुटखा खाऊन येथे तिथे थुकलेले डाग साफ करण्यासाठी रेल्वे वर्षाला सुमारे 1200 कोटी खर्च करते. विशेष म्हणजे, या प्रचंड रकमेत सुमारे 10 नवीन वंदे भारत ट्रेन तयार होऊ शकतात.

Shameful : काही गोष्टी ऐकायलाच बऱ्या वाटतात, त्या प्रत्यक्षात आचरणात आणण्याची अनेकांची तयारी नसते. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाचेही तसेच झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची घोषणा केली, तेव्हा त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. पण प्रत्यक्षात मात्र काही बदल झाल्याचे पाहण्यात आलेले नाही. प्रवाशांनी पानमसाला आणि गुटखा खाऊन कुठेही थुंकल्याचा फटका रेल्वे प्रशासनाला बसत आहे. पाहूया  एक रिपोर्ट -

भारतीय रेल्वेला देशाच्या वाहतूक व्यवस्थेचा आधारस्तंभ मानले जाते. दररोज 3 कोटींहून अधिक लोक रेल्वेने प्रवास करतात. पण, या महत्त्वाच्या सेवेचा वापर करणाऱ्या काही प्रवाशांच्या बेजबाबदार सवयी रेल्वेसाठी एक मोठे ओझे बनल्या आहेत. विशेषतः, पान मसाला आणि गुटखा खाऊन रेल्वेच्या डब्यात आणि स्टेशनवर थुंकणे ही एक मोठी समस्या बनली आहे.

थुंकलेल्या गुटख्याचे हे डाग काढण्यासाठी भारतीय रेल्वे दरवर्षी जो खर्च करते, तो आकडा धक्कादायक आहे. पान मसाला आणि गुटखा खाऊन थुंकल्याचे डाग साफ करण्यासाठी वर्षाला सुमारे 1200 कोटी रुपये खर्च केले जातात. रेल्वेचे डबे, प्लॅटफॉर्म आणि स्टेशन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी एवढी मोठी रक्कम वापरली जाते.म्हणजेच, एका वर्षात गुटख्याचे डाग साफ करण्यासाठी खर्च होणाऱ्या पैशात सुमारे 10 नवीन वंदे भारत ट्रेन तयार होऊ शकतात. एक वंदे भारत ट्रेन बनवण्यासाठी 110 ते 120 कोटी रुपये खर्च येतो. याच रकमेत अनेक राजधानी ट्रेनसुद्धा बनवता येऊ शकतात, हे विशेष.

गुटखा म्हणजे तंबाखू, सुपारी आणि सुगंधित पदार्थांचे मिश्रण असलेला एक चघळण्याचा पदार्थ. सार्वजनिक ठिकाणी याचे सेवन करून थुंकल्याने परिसर तर अस्वच्छ होतोच, पण आरोग्यासाठीही मोठा धोका निर्माण होतो. कालांतराने हे डाग भिंती, आसने आणि जमिनीवर कायमचे बसतात.

हे अस्वच्छ वातावरण केवळ रेल्वेचे सौंदर्यच नाही, तर प्रवाशांच्या आरोग्यावरही परिणाम करते. विशेषतः पावसाळ्यात, थुंकी पावसाच्या पाण्यात मिसळून रोगराई पसरण्याचा धोका असतो. यामुळे लहान मुले आणि वृद्धांसाठी अतिरिक्त धोका निर्माण होतो.

स्वच्छ भारतसारखे अनेक जनजागृतीचे प्रयत्न करूनही, लोकांच्या सवयींमध्ये बदल न झाल्याने ही समस्या कायम आहे. गुटख्याचे डाग साफ करण्यासाठी खर्च होणारे हे कोट्यवधी रुपये रेल्वे सुरक्षा, प्रवासी सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरले जाऊ शकतात. यासाठी प्रत्येक प्रवाशाने जबाबदारीने वागणे अत्यंत आवश्यक आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Aviation News : इंडिगोला टक्कर? दोन नवीन एअरलाइन्सची वाहतूक सेवा लवकरच
Smart Phone Ban: राजस्थानातील गावात महिलांच्या स्मार्टफोनवर घातलेली बंदी मागे