Republic Day 2026 Parade : आज भारत आपला 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दरवर्षीची परेड देशाची लष्करी ताकद, सांस्कृतिक विविधता आणि एकता दाखवते. यावेळी इतिहास घडवणारा क्षण आहे. या वेळी 77 वर्षांत अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत.
आतापर्यंत परेडमध्ये शस्त्रं आणि रणगाड्यांची झलक दिसायची, पण यावेळी युद्धाचं थेट सादरीकरण दाखवलं जाईल. यात सैनिक कसे हल्ला करतात, शत्रूवर कशी नजर ठेवली जाते, कमी वेळेत कशी कारवाई केली जाते हे दिसेल. म्हणजेच प्रेक्षक युद्ध फक्त पाहणार नाहीत, तर अनुभवतील.
26
पहिल्यांदाच दोन प्रमुख पाहुणे, जगाला मोठा संदेश
यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला पहिल्यांदाच दोन प्रमुख पाहुणे येत आहेत. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा एकत्र उपस्थित राहतील. याचा सरळ अर्थ आहे की भारत आणि युरोपचे संबंध आता खूप मजबूत झाले आहेत.
36
पहिल्यांदाच परेडमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा चित्ररथ
भारतीय चित्रपटसृष्टीला समर्पित एक चित्ररथही या वेळी परेडचा भाग असेल. भारतीय चित्रपट केवळ मनोरंजन नाहीत, तर आपल्या संस्कृतीचा आवाज आहेत, हे जगाला सांगणं हा याचा उद्देश आहे. याचं नेतृत्व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी करतील.
आता गॅलरी-1, गॅलरी-2 अशी नावं नसतील. या वेळी प्रजासत्ताक दिनी प्रेक्षक गॅलरींना गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी यांसारख्या नद्यांची नावं देण्यात आली आहेत. संदेश स्पष्ट आहे की, देशाप्रमाणेच परेडही सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विचार दाखवेल.
56
CRPF च्या पुरुष तुकडीचं नेतृत्व महिला अधिकाऱ्याच्या हाती
इतिहासात पहिल्यांदाच CRPF च्या पुरुष तुकडीचं नेतृत्व महिला अधिकारी सिमरन बाला करणार आहेत. हा केवळ परेडचा भाग नाही, तर भारतात आता नेतृत्व पात्रतेवरून ठरतं, लिंगावरून नाही, हा एक मोठा संदेश आहे.
66
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पहिल्यांदाच प्राण्यांची तुकडी
या वेळी परेडमध्ये प्राण्यांची एक विशेष तुकडीही संचलन करताना दिसेल. उंट, घोडे आणि इतर प्रशिक्षित प्राणी सैन्यासोबत कदम-ताल करताना दिसतील. यातून भारतीय लष्कराची ताकद केवळ शस्त्रांमध्ये नाही, तर प्रशिक्षण आणि रणनीतीमध्येही आहे, हे दिसून येईल.