IPL 2025 Final RCB vs PBKS बंगळुरुत पबमध्ये १+१ बिअर ऑफर, सामन्यासोबत मद्याचा चढणार रंग

Published : Jun 03, 2025, 05:41 PM ISTUpdated : Jun 03, 2025, 05:55 PM IST
IPL 2025 Final RCB vs PBKS बंगळुरुत पबमध्ये १+१ बिअर ऑफर, सामन्यासोबत मद्याचा चढणार रंग

सार

बंगळुरुत सगळीकडे आरसीबीचीच हवा आहे. आजच्या आरसीबी फायनल सामन्यासाठी बंगळुरुतल्या काही पब, रेस्टॉरंट्सनी भन्नाट ऑफर दिल्या आहेत. फ्री बिअर, १+१ कॉकटेल डीलसह अनेक ऑफर दिल्या आहेत.

बंगळुरु - या शहरात कुठे पाहिले तरी आरसीबी, आरसीबीचा जयघोषच ऐकू येतोय. सोशल मीडिया असो की बंगळुरुतला कोणताही रस्ता असो. आरसीबीचे घोषवाक्य, आरसीबीचे ध्वज, जर्सी दिसत आहेत. बंगळुरुत सगळीकडे आरसीबीची हवा, फायनलची हवा जोरात आहे. आतापर्यंत अनेक पब, रेस्टॉरंट्सच्या तिकिटांची विक्री झाली आहे. मोठ्या पडद्यावर, प्रत्येक घोटासोबत मित्रांसोबत गप्पा मारत सामना पाहण्याची सगळी तयारी झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरुतल्या काही पब, रेस्टॉरंट्सनी भन्नाट ऑफर दिल्या आहेत. १+१ बिअर, १+१ कॉकटेल, बकेट बिअर, मग बिअरसह इतर अल्कोहोलवर ऑफर दिल्या आहेत.

चौकार मारला तर फ्री बिअर

बंगळुरुतले अनेक पब, रेस्टॉरंट्स आता भन्नाट ऑफर देत आहेत. सवलतीच्या दरात अल्कोहोल, विविध फ्लेवरसह एकापेक्षा एक वेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत. तावरेकेरेच्या नवीन पब ४०४ मध्ये एक नवीन ऑफर दिली जात आहे. आरसीबीचा फलंदाज जर एका षटकात ४,०,४ मारला म्हणजे चौकार, डॉट बॉल आणि पुन्हा चौकार मारला तर पुढच्या ३ चेंडूत पब बार काउंटरवरून फ्री बिअर मिळेल. ४०४ हे पबचे नाव असल्याने ही ऑफर दिली जात आहे. तसेच वेगवेगळ्या फ्लेवरचे बिअर सवलतीच्या दरात दिले जात आहे.

तीन खरेदी केल्यास एक फ्री

दोड्डनेकुंडी यार्डमध्ये सर्वात मोठा पडदा लावण्यात आला आहे. तसेच मैदानाबाहेर षटकार मारल्यास अनेक ऑफर दिल्या जात आहेत. तसेच चौकारावर बिअरची ऑफर दिली जात आहे. तीन बिअर खरेदी केल्यास एक फ्री, तर दुसरी ऑफर ६ बिअर खरेदी केल्यास २ बिअर फ्री अशी आहे. तसेच सवलतीच्या ऑफरमध्ये १,९९९ रुपयांना एन्ट्री आणि वेलकम ऑफर दिली जात आहे.

१+१ बकेट बिअर ऑफर

जेपी नगरातल्या पबमध्ये आरसीबीच्या प्लेइंग ११ खेळाडूंच्या प्रतीकात्मक ११ वेगवेगळे शॉट्स तयार करण्यात आले आहेत. विविध फ्लेवरचे शॉट्स आहेत. काही तिखट फ्लेवरचे शॉट्सही तयार करण्यात आले आहेत. हे आरसीबी संघाला योग्य आहे असे पब व्यवस्थापकाने सांगितले. तसेच काही पब आणि रेस्टॉरंट्समध्ये १+१ बकेट बिअर ऑफर, १+१ कॉकटेल ऑफरसह अनेक ऑफर दिल्या जात आहेत.

फायनल सामन्याची उत्सुकता

२०२५ च्या आयपीएल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत आरसीबी संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. फायनल सामन्यात पंजाब किंग्जशी त्यांचा सामना होणार आहे. आज (जून ३) संध्याकाळी ७.३० वाजता सामना सुरू होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

पात्रता सामन्यात पंजाबचा पराभव केला होता आरसीबीने

उत्कृष्ट कामगिरी करत आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचला होता. पहिल्या पात्रता सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा पराभव केला होता. त्यामुळे ते थेट फायनलमध्ये पोहोचले होते. पंजाब संघाला १०१ धावांत बाद करत आरसीबीने २ गडी गमावत १० षटकांत सामना जिंकला होता.

गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आरसीबीने

लीग फेरीत आरसीबीने चांगली कामगिरी केली होती. १४ सामन्यांपैकी आरसीबीने ९ सामने जिंकले होते. त्यामुळे त्यांना १९ गुण मिळाले होते. एक सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर ४ सामन्यांमध्ये आरसीबीचा पराभव झाला होता. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ते पहिल्या पात्रता सामन्यासाठी पात्र ठरले होते.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

IOC, BPCL आणि HPCL च्या डॉलरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी RBI ची नवी सुविधा
EaseMyTrip : ईझमायट्रिपची 'योलो बस एक्सप्रेस' सुरू, आता बस प्रवास होणार आणखी सुखकर