Repo Rate Unchanged : कर्जदारांना मोठा दिलासा, रेपो रेटमध्ये कोणाताही बदल न करण्याची आरबीयकडून घोषणा

Published : Jun 05, 2026, 10:45 AM IST
Repo Rate Unchanged : कर्जदारांना मोठा दिलासा, रेपो रेटमध्ये कोणाताही बदल न करण्याची आरबीयकडून घोषणा

सार

Repo Rate Unchanged : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पतधोरण जाहीर केलं आहे. रेपो रेटमध्ये कोणताही बदल न केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुमच्या होम लोन किंवा कार लोनच्या EMI वर याचा काय परिणाम होईल? जाणून घ्या सविस्तर.

RBI Repo Rate News: तुम्ही तुमच्या घराच्या, गाडीच्या किंवा पर्सनल लोनच्या EMI वाढीच्या भीतीने त्रस्त असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीचे निकाल जाहीर केले आहेत. आरबीआयने यावेळी तुमच्या खिशावर कोणताही नवीन भार टाकलेला नाही आणि रेपो रेट 5.25% वर स्थिर ठेवला आहे. आरबीआयने आपली भूमिकाही 'न्यूट्रल' ठेवली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, अमेरिका-इराणमधील युद्ध आणि कडाक्याच्या उन्हाळ्यासारखी आव्हानं असतानाही, रिझर्व्ह बँकेने सध्या तरी कर्जाचे व्याजदर न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे तुमचा महिन्याचा हप्ता जसा होता, तसाच राहणार आहे.

गेल्या ५ बैठकांमध्ये रेपो रेटमध्ये काय बदल झाले?

फेब्रुवारी २०२५: ०.२५% कपात (दिलासाची सुरुवात)

एप्रिल २०२५: ०.२५% ची आणखी एक कपात

जून २०२५: ०.५०% ची मोठी कपात (कर्ज सर्वात स्वस्त झाले)

डिसेंबर २०२५: ०.२५% कपात

फेब्रुवारी २०२६: कोणताही बदल नाही, दर ५.२५% वर स्थिर

रेपो रेट म्हणजे काय?

रेपो रेट म्हणजे तो व्याजदर, ज्या दराने आरबीआय इतर बँकांना, जसं की SBI, HDFC, ICICI यांना कर्ज देते. जेव्हा हा दर स्थिर राहतो, तेव्हा तुमच्या बँकासुद्धा तुमच्या होम लोन किंवा कार लोनचे व्याजदर वाढवत नाहीत.

रेपो रेट न वाढल्याने तुम्ही काय करावं?

नवीन कर्ज घेण्यासाठी चांगली वेळ

गेल्या वर्षीच्या तुलनेत व्याजदर बरेच कमी (५.२५%) असल्याने, जर तुम्ही नवीन घर किंवा गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर फ्लोटिंग रेटवर कर्ज घेण्यासाठी ही एक चांगली संधी असू शकते.

फिक्स्ड डिपॉझिटचा (FD) फायदा

तुमच्याकडे काही अतिरिक्त बचत असेल, तर सध्या बँकांमध्ये एफडीवर चांगले व्याजदर मिळत आहेत. शॉर्ट-टर्म किंवा लाँग-टर्म एफडीमध्ये पैसे गुंतवणे हा एक सुरक्षित पर्याय ठरू शकतो.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

देवेंद्र फडणवीस म्हणाले, योग तणावावर उपाय | International Yoga Day | Devendra Fadnavis| Modi
Amruta Fadnavis on International Yoga Day | अमृता फडणवीस यांचा संदेश | Divija Fadnavis | Sreeleela