Rahul Gandhi : विदेशी शक्तींशी संबंधांवरून राहुल गांधींचं मोदींना खुल्या चर्चेचं आव्हान, 24 तास उलटूनही उत्तर नाही

Published : Nov 03, 2026, 09:03 PM IST
Rahul Gandhi : विदेशी शक्तींशी संबंधांवरून राहुल गांधींचं मोदींना खुल्या चर्चेचं आव्हान, 24 तास उलटूनही उत्तर नाही

सार

विदेशी शक्तींशी संबंध असल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. २४ तास उलटून गेले तरी मोदींनी कोणतंही उत्तर दिलं नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

नवी दिल्ली : विदेशी शक्तींशी संबंध असल्याच्या आरोपावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. २४ तास उलटून गेले तरी मोदींनी यावर कोणतंही उत्तर दिलं नसल्याचा टोला राहुल यांनी लगावला. दुसरीकडे, भाजपने राहुल गांधींच्या आगामी परदेश दौऱ्याची माहिती उघड करत त्यांच्यावर पलटवार केला आहे.

विरोधी पक्षनेते देशद्रोही आहेत आणि विदेशी शक्तींसोबत मिळून देशाशी गद्दारी करत आहेत, असे आरोप भाजपकडून सातत्याने होत आहेत. याच आरोपांचा आधार घेत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. विदेशी शक्तींच्या मदतीनेच नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर टिकून आहेत, असा गंभीर आरोप राहुल यांनी केला. हे खोटं असेल तर मोदींनी सिद्ध करून दाखवावं, असं आव्हान त्यांनी दिलं. मात्र, २४ तास उलटूनही पंतप्रधान गप्पच असल्याने राहुल यांनी आता खुल्या चर्चेचं नवं आव्हान दिलं आहे.

"देशद्रोही कोण आहे, विदेशी शक्तींशी कोणाचे संबंध आहेत आणि ते कोणत्या प्रकारचे आहेत, हे न घाबरता उघडपणे सांगा. आपण एका टेबलावर समोरासमोर बसून चर्चा करूया, मीडिया आणि देशातील जनतेलाही ते ऐकू द्या," असं राहुल गांधी म्हणाले.

या वादात भाजपने राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याची माहिती उघड करत जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी एक्सवर (ट्विटर) टीका करताना म्हटलं की, राहुल गांधी येत्या १६ ते १९ तारखेदरम्यान अमेरिका दौऱ्यावर असणार आहेत. सध्या त्यांना मतं मागण्यापेक्षा स्वतःच्या काही कमकुवतपणांवर लक्ष देणं जास्त महत्त्वाचं वाटत आहे. काँग्रेसच्या सूत्रांनीही याला दुजोरा दिला असून, १६ ते १९ तारखेदरम्यान न्यूयॉर्क आणि शिकागोमध्ये राहुल गांधींचे काही कार्यक्रम असल्याचं सांगितलं जात आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Road Markings : रस्त्यावरील पांढऱ्या आणि पिवळ्या पट्ट्यांचा अर्थ माहितीये का?
Raj Thackeray l राज ठाकरे यांच्या नातीचं नाव काय ठेवलं? नावाला 301 वर्षांचा इतिहास