Kriti Sanon : कपड्यांवरून वाद, राहुल गांधींकडून क्रिती सेननचं समर्थन; म्हणाले - 'तिची निवड, तिचं स्वातंत्र्य'

Published : Aug 25, 2026, 10:38 PM IST
Rahul Gandhi

सार

Rahul Gandhi on Kriti Sanon : एका रक्षाबंधन जाहिरातीतील कपड्यांवरून अभिनेत्री क्रिती सेननला ट्रोल केलं जात आहे. यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी क्रितीची बाजू घेतली असून, 'महिलांनी काय घालावं हा त्यांचा निर्णय आहे,' असं म्हटलं आहे.

मुंबई : एका ज्वेलरी ब्रँडच्या रक्षाबंधन जाहिरातीतील कपड्यांमुळे बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या चर्चेत आहे. या जाहिरातीत क्रितीने डीप-नेक ब्लाउज आणि आयव्हरी रंगाचा लेहेंगा घातला आहे. अनेकांना तिचा हा लूक आवडला, तर काहींनी संस्कृती आणि परंपरेच्या नावाखाली याला 'अयोग्य' ठरवत तिच्यावर टीका केली.

राहुल गांधी क्रितीच्या समर्थनार्थ मैदानात

या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देताना, काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे. 'एखाद्या महिलेने काय घालावं, काय करावं आणि कुठे जावं, ही तिची निवड आहे. महिलांना त्यांच्या स्वातंत्र्याचा वापर करण्यापासून रोखणं थांबवा,' असं त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे.

जाहिरातीतील कपड्यांवरून कृती सेनन ट्रोल, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

या टीकेला थेट उत्तर देताना कृतीने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं, "सणांचं महत्त्व तुम्ही घातलेल्या कपड्यांमध्ये नसतं, तर तुमच्या भावनांमध्ये आणि परंपरेबद्दलच्या आदरात असतं. रक्षाबंधन हे संरक्षणाचं बंधन आहे. मी आणि माझी बहीण एकमेकांना राखी बांधतो. आम्हाला माहित आहे की आम्ही एकमेकांचं संरक्षण भावापेक्षा कमी करणार नाही. आम्ही एकमेकांच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. आणि आमच्यासाठी ही प्रार्थना आमच्या कुत्र्यांसाठीही आहे! कारण तेही आमचं कुटुंब आहेत! तसंच, आपण महिलांना काय घालायचं हे सांगणं कधी थांबवणार आहोत?? गेल्या काही वर्षांत एथनिक फॅशन खूप बदलली आहे, पण तरीही महिलेच्या संस्कृतीचा आदर तिच्या कपड्यांवरूनच मोजला जातो!! संस्कृती आणि परंपरा तिच्या हृदयात असते, तिच्या नेकलाईनमध्ये नाही!"

कंगना रणौतनेही दिली प्रतिक्रिया

क्रितीच्या या पोस्टनंतर, अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतनेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक नोट शेअर केली. तिने लिहिलं, "आजच्या काळात महिला असणं खूप छान आहे. आपल्याकडे कपड्यांचे अनेक प्रकार आहेत, आजची महिला ग्लोबल आहे. कॉकटेल ड्रेसपासून लेहेंगा चोलीपर्यंत, जीन्स ते साडी, बिकिनी ते सलवार कमीझपर्यंत, आपल्याकडे इतके पर्याय उपलब्ध असताना तुम्ही तुमच्या भावाला बिकिनी/अंतर्वस्त्रात राखी का बांधाल? तुमचे स्टायलिंगचे बाकीचे पर्याय कुठे गेले? हा हा, ही जाहिरात मुद्दामहून विचित्र वाटावी अशी बनवली आहे!"

क्रितीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास...

कामाबद्दल बोलायचं झाल्यास, क्रिती सेनन शेवटची 'कॉकटेल २' मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्याही भूमिका होत्या. होमी अदजानिया यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Ramdas Athawale: 'मतं चोरीला गेली तर राहुल गांधी कसे जिंकले?', आठवलेंचा विरोधकांना सवाल
Dhruv Rathee Press Conference | ध्रुव राठींचं मोदी, शाह, ज्ञानेश कुमारांना आव्हान