Lok Sabha Election 2024: इंडी आघाडीच्या कोणत्या नेत्यावर पंतप्रधान मोदी बोले? विरोधकांच्या मनात विष भरले असल्याचा देखील उल्लेख

सध्या लोकसभा निवडणूकिची रणधुमाळी सुरु आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप करत असून नरेंद्र मोदी यांनी इंडी आघाडीमध्ये संघर्ष सुरु असल्याचे बोलत विरोधकांवर घणाघात केला आहे.

Ankita Kothare | Published : Apr 7, 2024 11:31 AM IST

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून पंतप्रधान मोदींनी आज बिहार येथील जमुई येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातुन इंडी आघाडी, काँग्रेस आणि आरजेडीवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, इंडी आघाडीकडे ना दृष्टी आहे ना विश्वासार्हता.दिल्लीत एकत्र उभे असलेले तेच लोक वेगवेगळ्या राज्यातून एकमेकांना शिव्या देतात. तसेच बिहारमध्ये देखील जागावाटपातून आपापसात संघर्ष आहे.हे लोक मजबुरीने एकत्र आले आहेत आणि त्यांच्या मजबुरीला एकच नाव आहे - सत्तेचा स्वार्थ. त्यामुळे या लोकांना सत्तेपासून दूर ठेवणे आवश्यक आहे.

इंडी आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही :

विरोधकांनी अजूनही पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. कारण त्यांच्याकडे उमेदवारच नाही. तसेच उमेदवार घोषित करण्यासाठी टाळाटाळ करत आहे. मी याबाबत जरा चौकशी केली तर समजलं आता नाही तर निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करतील, असे इंडी आघाडीच्या सदस्यांचे म्हणणे आहे.

पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर राजकारण तापले आहे

दिल्लीत एकत्र येतात एकमेकांनी हात पकडतात मात्र निवडणुकीत युती कुठेही दिसून येत नाही. मी थोडी चौकशी केली तेव्हा कळले की, गेल्या १५ दिवसांपासून विरोधकाच्या ज्येष्ठ नेत्याच्या घरी वादळ सुरू आहे. जोपर्यंत त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करत नाही तोपर्यंत ते निवडणूक प्रचाराला जाणार नाहीत, यावर ते नेते ठाम आहेत असं देखील समजलं आहे. ते लोक सांगू शकत नाहीत की त्यांचा नेता कोण आहे? ते लोक आतून भांडत आहेत. आता नाही तर निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करतील, असे सदस्यांचे म्हणणे आहे. आणि, जोपर्यंत तुम्ही मला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करत नाही तोपर्यंत मी रॅलीला जाणार नाही, असे त्या नेत्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे.

मोदींना घाबरताय का?

पीएम मोदींनी म्हणाले की, इंडी आघाडीच्या एका मोठ्या नेत्याने म्हटले आहे की मोदी जी हमी देतात त्यावर बंदी घालावी. मोदींची हमीच बेकायदेशीर असल्याचे हे लोक म्हणतात.माझ्या "मोदी हैं ,तो मुमकिन है" याला विरोधक घाबरतात का ? असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला.पुढे ते म्हणाले की,मोदींचा जन्म मौजमजा करण्यासाठी झाला नाही. मोदींचा जन्म फक्त कठोर परिश्रम करण्यासाठी झाला आणि तोही 140 कोटी देशवासियांसाठी.

आणखी वाचा: 

छगन भुजबळ यांनी फक्त लोकसभेला उभे राहूद्या मग दाखवतो, मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना दिले आव्हान

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे दोन मुले आहेत सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती?

 

Read more Articles on
Share this article