पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन प्रमुख सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी, जाणून घ्या सविस्तर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणुकीआधी गेल्या काही दिवसांपासून हजारो-लाखो कोट्यावधी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करत आहेत.

Semiconductor projects : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आगामी लोकसभा निवडणुकीआधी (Lok Sabha Election) गेल्या काही दिवसांपासून हजारो-लाखो कोट्यावधी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करत आहेत. अशातच आज (13 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांच्या हस्ते भारतातील तीन प्रमुख सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. यावेळी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून 'इंडियाज टेकेड : चिप्स फॉर विकसित भारत' कार्यक्रमाला संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाउंट ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले की, “13 मार्च 2024 चा दिवस खास असणार आहे. यासाछी इंडियाज टेकेड : चिप्स फॉर विकसित भारत कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहे. याशिवाय 1.25 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक तीन सेमीकंडक्टर सुविधांची पायाभरणी करणार आहे. ” कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे 60 हजारांहून अधिक संस्थेतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

सेमीकंडक्टर प्रकल्पासंदर्भात पंतप्रधानांचा उद्देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते, सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी केल्याने देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या प्रकल्पाला एका व्हिजनप्रमाणे पाहिले जात आहे. भारतात सेमीकंडक्टर फॅबची स्थापना करण्यासाठी संशोधित योजनेअंतर्गत धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्र (DSIR) मध्ये सेमीकंडक्टर निर्माणची सुविधा टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे स्थापन केली जाणार आहे.

91 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करण्यासह हा देशातील पहिलाच कमर्शिअल सेमीकंडक्टर फॅबचे प्रतीक असणार आहे. याशिवाय आसाममधील मोरीगाव Outsourced Semiconductor Assembly and Test (OSAT) मध्ये 27 हजार कोटी रुपये आणि गुजरातमधील साणंद येथे जवळजवळ 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

केंद्र सरकारचा सेमीकंडक्टर उद्योगाबद्दलचा दृष्टीकोन
केंद्र सरकारने भारतात सेमीकंडक्टर उद्योगात प्रगती करण्यासाठी सेमीकंडक्टर विनिमिर्माण युनिटसाठी भारत सेमीकंडक्टर मोहिमेची स्थापना केली आहे. यामुळे भारतातील सेमीकंडक्टर इको-सिस्टिम मजबूत होणार आहे. या युनिटच्या मदतीन सेमीकंडक्टर उद्योगामध्ये हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

आणखी वाचा : 

Rameshwaram Cafe : बंगळुरू रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील मुख्य संशयिताला NIA ने केली अटक

पंतप्रधान मोदींनी जगाला एका दिवसात दिले 2 मोठे संदेश, विकसित भारताचा दिला संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 41 दिवसांत 24 राज्यांचा गेला जलद दौरा, बंगालातही पोहोचले पंतप्रधान

Share this article