PM Modi's 7 Appeals: भारत आर्थिक सावधतेच्या मोडमध्ये? मोदींच्या आवाहनानंतर अनेक प्रश्न उपस्थित

Published : May 12, 2026, 09:10 AM IST
PM Modi's 7 appeals

सार

PM Modi's 7 appeals : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पुढील वर्षभर सोन्याची खरेदी टाळण्याचे, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आणि वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. जागतिक स्तरावर वाढलेल्या तणावामुळे भारताच्या परकीय चलन साठ्यावर ताण निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे. 

PM Modi's 7 appeals : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसरीचे आवाहन केले आहे. पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा आणि शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, असे आवाहन मोदी यांनी सलग दोन दिवस विविध कार्यक्रमांतून केले. या वक्तव्यामुळे देशभरात चर्चांना उधाण आले असून ज्वेलरी उद्योगासह विविध क्षेत्रांत चिंता व्यक्त केली जात आहे.

सोन्याच्या खरेदीवर मोदींचं मोठं आवाहन

लग्नसमारंभांसाठी किंवा गुंतवणुकीसाठी पुढील वर्षभर सोन्याची खरेदी टाळावी, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. परकीय चलन साठ्यावर वाढता दबाव आणि जागतिक आर्थिक अस्थिरता लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्वेलरी उद्योगात भीतीचे वातावरण

मोदींच्या आवाहनानंतर दागिने व्यवसायाशी संबंधित उद्योगांमध्ये खळबळ उडाली आहे. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) ने चिंता व्यक्त करत सांगितले की, सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर घटल्यास देशातील १ कोटींहून अधिक लोकांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो. ज्वेलरी उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे १० लाख कोटी रुपये असून त्यात ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे तेलदरात वाढ

इराण-अमेरिका तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात अस्थिरता कायम आहे. या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची वाहतूक होते. तणाव वाढल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा दर १०४ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेला असून अमेरिकेतही तेलदरात जवळपास ३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

सरकारवर डॉलर साठा जपण्याचा दबाव

भारताला तेल, गॅस, सोने आणि खतांसारख्या अनेक वस्तूंची आयात करावी लागते आणि त्यासाठी डॉलरमध्ये पेमेंट करावे लागते. जागतिक बाजारात दर वाढल्यामुळे अधिक डॉलर खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे परकीय चलन साठ्यावर ताण वाढत असून रुपयावर दबाव निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार नागरिकांना अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन करत आहे.

मोदींनी देशवासियांना केलेली प्रमुख आवाहनं

  • सोन्याची खरेदी टाळा
  • पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा
  • वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या
  • परदेश प्रवास टाळा
  • खाद्यतेलाचा वापर कमी करा
  • नैसर्गिक शेतीचा अवलंब करा
  • स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढवा

‘सावधगिरीचा उपाय’ म्हणून सरकारचं पाऊल

तज्ज्ञांच्या मते, पंतप्रधानांचे हे आवाहन तातडीच्या आर्थिक संकटाची घोषणा नसून एक ‘सावधगिरीचा उपाय’ आहे. जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या काळात भारताचा परकीय चलन साठा सुरक्षित ठेवणे आणि भविष्यातील संभाव्य आर्थिक धक्क्यांपासून देशाला वाचवणे हा यामागचा उद्देश असल्याचे मानले जात आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Robinhood Stock: ट्रुइस्टने वाढवले टार्गेट, वॉल स्ट्रीटवरही चर्चा
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न! कालीघाटमधील धक्कादायक घटना