
नवी दिल्ली: दिवाळीच्या सणासुदीला देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एक खास भेट मिळणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) २४ वा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. याआधी केंद्राने २३ हप्ते शेतकऱ्यांना दिले आहेत. गेल्या जून महिन्यात सरकारने २३ व्या हप्त्याचे पैसे जमा केले होते.
पंतप्रधान मोदींची ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. देशातील पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार दरवर्षी ६००० रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवतं. ही रक्कम एकाच वेळी न देता तीन टप्प्यांत विभागून दिली जाते.
पीएम किसानच्या नियमांनुसार, दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना २००० रुपयांचा हप्ता दिला जातो. जून महिन्यात २३ वा हप्ता मिळाल्यामुळे, पुढचे चार महिने ऑक्टोबरमध्ये पूर्ण होतात. त्यामुळे केंद्र सरकार येत्या ऑक्टोबर महिन्यात २४ व्या हप्त्याचे पैसे जारी करणार आहे. लवकरच सरकार याची अधिकृत घोषणा करेल अशी शक्यता आहे.
अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. कृषी मंत्रालय लवकरच याबाबत माहिती देईल. देशातील कोट्यवधी शेतकरी कुटुंबांना शेतीचा खर्च भागवण्यासाठी या पैशांची मोठी मदत होते. सरकारकडून पैसे तर येणारच आहेत, पण ते तुमच्या खात्यात जमा व्हावेत यासाठी खालील गोष्टी पूर्ण करणं गरजेचं आहे.
अधिक माहितीसाठी किंवा तुमच्या खात्याचं स्टेटस तपासण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्या. तिथे तुम्ही तुमचं लाभार्थी स्टेटस चेक करू शकता.
देशातील शेतकऱ्यांना छोटीशी आर्थिक मदत देण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ फेब्रुवारी २०१९ रोजी ही योजना अधिकृतपणे लागू केली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून पंतप्रधान मोदींच्या हस्ते याची सुरुवात झाली. ही योजना १ डिसेंबर २०१८ पासूनच लागू झाल्याचं मानलं जातं. तेव्हापासून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये जमा होत आहेत. दर चार महिन्यांनी २ हजार रुपये याप्रमाणे हे पैसे दिले जातात.