
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे दर मंगळवारी (१० नोव्हेंबर) बहुतांश प्रमुख शहरांमध्ये स्थिर राहिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत बदल होऊनही देशांतर्गत इंधन कंपन्यांनी दरात कोणताही बदल केलेला नाही. यामुळे जागतिक बाजारातील अस्थिरतेच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या आकडेवारीनुसार, देशाच्या राजधानीत इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत पेट्रोल-डिझेल अजूनही स्वस्त आहे. तर दिलेल्या सहा प्रमुख शहरांपैकी हैदराबादमध्ये इंधनाचे दर सर्वात जास्त आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी उलथापालथ होऊनही देशांतर्गत बाजारात दर स्थिर आहेत. मध्य पूर्वेतील तणावामुळे तेलाच्या किमतीत जे झटके बसत आहेत, त्यापासून भारतातील ग्राहकांचा सध्या तरी बचाव झाला आहे.
पेट्रोल निर्यातीवर लावली जाणारी अतिरिक्त उत्पादन शुल्क हटवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. असे असले तरी देशातील रिटेल किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
दुसरीकडे, इराणवरील पुढील हल्ले टाळण्याच्या शक्यतेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यानंतर जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. सध्या हा संघर्ष संपवण्यासाठी मुत्सद्दी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
ब्रेंट क्रूड फ्युचर्स ५.८५ टक्क्यांनी घसरून ९२.५७ डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूड फ्युचर्स ४.३८ टक्क्यांनी घसरून ८६.८५ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले आहेत.
राज्यांनुसार व्हॅट (VAT), वाहतूक खर्च आणि इतर स्थानिक करांमध्ये फरक असल्याने प्रत्येक शहरात इंधनाचे दर वेगवेगळे असतात. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर आणि चलनातील चढ-उतार याचाही पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर परिणाम होतो. तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता इंधनाचे नवीन दर लागू करतात. त्यामुळे पेट्रोल पंपावर जाण्यापूर्वी ग्राहकांनी आजचे ताजे दर तपासून पाहणे फायद्याचे ठरते.