Passport Fees : 1 जुलैपासून पासपोर्टसाठी मोजावे लागणार अधिक पैसे; जाणून घ्या नवे शुल्क

Published : Jun 25, 2026, 07:57 PM IST
Visa Free Countries for Indian Passport

सार

1 जुलैपासून पासपोर्टसंबंधित शुल्कात बदल लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवीन दरांनुसार पासपोर्ट काढण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना पूर्वीपेक्षा वेगळे शुल्क भरावे लागू शकते. परदेश प्रवास, शिक्षण किंवा नोकरीसाठी पासपोर्ट बनवण्याचा विचार करणाऱ्यांनी नवीन शुल्क रचना आणि नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे.

केंद्र सरकारने पासपोर्ट आणि त्यांच्याशी संदर्भात फीमध्ये वाढ केली आहे. सध्या पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढत आहेत. अनेक जणांनी पासपोर्टसाठी अर्ज केला आहे. पण आता या संदर्भात एक अशी बातमी समोर आली आहे की, पासपोर्टच्या फीमध्ये वाढ झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही वाढ पुढच्या महिन्यापासून लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नव्या नियमानुसार 1 जुलै 2026 पासून ही वाढ होणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला पासपोर्ट काढण्यासाठी 2500 रुपये मोजावे लागणार आहेत.

नवीन पासपोर्ट बनवायचा असेल किंवा जुना पासपोर्ट रिन्यू करायचा असेल त्यासाठी आता दोन हजार पाचशे रुपये मोजावे लागणार आहेत. पासपोर्ट नियमांबाबत 1980 चे नियम बदलून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. हे नवीन नियम 1 जुलै 20026 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे तुम्ही देखील अजून पासपोर्टसाठी अर्ज केला नसेल तर करु शकता. कारण 1 जुलैनंतर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

पासपोर्टसाठी आता किती रुपये मोजावे लागणार

36 पानांचा पासपोर्ट

आधी 1500 रुपये आता 2500 रुपये

आधी 3500 रुपये आता 5000 रुपये (तत्काळ)

60 पानांचा पासपोर्ट

आधी 2000 आता 3500 रुपये

आधी 4000 आता 6000 रुपये (तत्काळ)

36 पानांचा पासपोर्ट हरवला तर

आधी 15 रुपये आता 5000

आधी 3500 आता 7500 (तत्काळ)

60 पानांचा पासपोर्ट हरवला तर

आधी 2000 आता 6000 रुपये

आधी 4000 आता 8500 रुपये (तत्काळ)

18 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी

आधी 1000 रुपये आता 1750 रुपये

आधी 3000 रुपये आता 4250 रुपये

हरवला किंवा फाटला तर

आधी 1000 आता 4250 रुपये

आधी 3000 आता 6750 रुपये

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Berlin Marathon: बर्लिन मॅरेथॉनमध्ये चिनी इन्फ्लुएन्सरची चोरी पकडली, सायकलवरून मारली शॉर्टकट!
Morgan Stanley: मॉर्गन स्टॅनलीने MARA, RIOT, GLXY चे टार्गेट घटवले, तरीही १००% पेक्षा जास्त फायद्याची शक्यता