पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल ठोकर आणि आसिफ शेख यांची घर केली उद्ध्वस्त (Watch Video)

Published : Apr 25, 2025, 09:40 AM ISTUpdated : Apr 25, 2025, 09:57 AM IST
Pahalgam  terrorists Photo

सार

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोन दहशतवादी आदिल हुसैन आणि आसिफ शेख यांची घर उद्ध्वस्त करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन घाटात 22 एप्रिलला भ्याड दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 28 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. याचे प्रतिसाद जगभरात उमटत आहेत. अशातच दहशतावादी हल्ल्याचे उत्तर देण्यासाठी आता सुरक्षाबलाकडून कठोर कार्यवाही करण्यात आली आहे. या हल्ल्यातील स्थानिक दहशतवाद आदिल हुसैन ठोकरचे बिजबेहरा येथील घर बॉम्बने उडवण्यात आले आहे. याशिवाय आदिलचा साथीदार आसिफ शेखचे त्राल येथील घर बुलढोझरने पाडण्यात आले आहे.

पाकिस्तानात रचला कट

सैन्याच्या सूत्रानुसार, आदिल हुसैन ठोकर उर्फ आदिल गुरीने वर्ष 2018 मध्ये वैध पद्धतीने अटारी-वाघा बॉर्डर पार करत पाकिस्तानचा प्रवास केला होता. येथे त्याने दहशतवादी कॅम्पमध्ये ट्रेनिंग घेतली. यानंतर गेल्या वर्षातच आदिल जम्मू-काश्मीरला परतत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मदतीने बैसरन घाटातील हल्ल्यात सहभागी झाला.

हिंदू पर्यटकांवर हल्ला

22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या चार दहशतवाद्यांचा समावेश होता. यामध्ये दोन पाकिस्तानी आणि दोन स्थानिक होते. या दहशतवाद्यांकडे AK-47 रायफल होत्या. हल्ल्यावेळी त्यांनी धर्म विचारुन पर्यटकांवर हल्ला केला. यामध्ये बहुतांशजण फिरण्यासाठी जम्मू-काश्मीरला आले हते.

प्रशासनाकडून कठोर इशारा

जम्मू-काश्मीरचया प्रशासनाने दहशतवादी नेटवर्क मूळापासून संपवण्यासाठी त्यांच्या परिवारासह संपत्तीवर कार्यवाही वेगाने सुरू केली आहे. दहशतवाज्यांचे घर उद्ध्वस्त करत असा संदेश दिला आहे की, कश्मीरच्या भूमीवर दहशतवादाला खतपाणी घालणार नाही.

व्हिडीओ व्हायरल

सुरक्षादलाने आदिलचे घर बॉम्बने उडवले तर आसिफचे घर बुलडोझरने पाडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून दहशतवाद्यांना इशारा देण्यात आला आहे.

 

 

 

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

Recommended Stories

Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department