
पहलगाम दहशतवादी हल्ला २०२५: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करून अनेक पर्यटकांचा बळी घेतला आहे. सुरुवातीला एका मृत्युचा दावा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी संध्याकाळी २६ मृत्युंची पुष्टी केली. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात शांत आणि सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक असलेले पहलगाम सध्या रक्ताने माखले आहे. पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच येथील गर्दी आता भीती आणि शांततेत बदलली आहे. हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने तातडीने मदतीसाठी अनेक हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यासाठी २४x७ कंट्रोल रूम आणि टूरिस्ट डेस्क पूर्णपणे सक्रिय करण्यात आले आहेत.
जर तुमचे कोणी परिचित किंवा कुटुंबीय या भागात असतील आणि तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकत नसाल तर तुम्ही थेट श्रीनगर इमर्जन्सी कंट्रोल रूमशी संपर्क साधू शकता:
पर्यटकांच्या मदतीसाठी २४/७ टूरिस्ट हेल्प डेस्क अनंतनाग पोलीस कंट्रोल रूममध्ये सुरू आहे, जिथे तातडीने माहिती आणि मदत मिळू शकते:
जम्मू-काश्मीर पर्यटन विभागानेही आपत्कालीन संपर्कासाठी अधिकाऱ्यांचे नंबर जाहीर केले आहेत, जेणेकरून प्रवाशांना सर्वतोपरी मदत करता येईल:
प्रत्यक्षदर्शींच्या मते, दहशतवादी सैन्याच्या गणवेशात होते आणि त्यांनी अगदी जवळून गोळीबार सुरू केला. घटनास्थळी रक्ताने माखलेली जमीन, इकडे-तिकडे विखुरलेले मृतदेह आणि रडणाऱ्या महिला, हे दृश्य भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हते. स्थानिक लोक ताबडतोब मदतीसाठी धावून आले आणि जखमींना सुरक्षित स्थळी नेले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की दहशतवाद्यांनी एका महिलेला तिचा धर्म विचारला आणि नंतर बेछूट गोळीबार सुरू केला.