पद्मश्री डॉ. सुबन्ना अय्यप्पन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ, कावेरी नदीत सापडला मृतदेह

Published : May 13, 2025, 01:16 PM IST
subbanna ayyappan

सार

प्रसिद्ध वैज्ञानिक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. सुबन्ना अय्यप्पन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 10 मे ला कावेरी नदीजवळील साई आश्रम, श्रीरंगपट्टण येथे त्यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Subbanna Ayyappan Passes Away : माजी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक आणि पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेले डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी 10 मे रोजी कर्नाटकातील कावेरी नदीजवळील साई आश्राम, श्रीरंगपट्टण येथे एक मृतदेह आढळला गेला. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याची ओखळ पटवली.

7 मे पासून होते बेपत्ता
डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन आपल्या पत्नीसह मैसूर येथे राहत होते. त्यांना दोन मुली आहेत. 7 मे पासून अय्यप्पन बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. अय्यप्पन यांची स्कूटरही कावेरी नदीजवळ सापडली. श्रीरंगपट्टण पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. आता त्यांच्या मृत्यूमागील नक्की कारण काय या शोध घेतला जात आहे.

कोण होते डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन?
डॉ. सुब्बन्ना अय्यपन्न प्रसिद्ध वैज्ञानिक होते. त्यांना ‘नील क्रांती’साठी वर्ष 2022 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते अय्यपन्न यांनी मत्स्य पालनाचे असे तंत्रज्ञान विकसित केले होते, ज्यामुळे संपूर्ण भारतात मासे पालनाची पद्धत बदलली गेली होती. त्यांचा कामामुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. खाद्य सुरक्षा मजबूत झाली.

कर्नाटकातील चामराजनगरके येंलांडूरमध्ये 10 डिसेंबर 1955 रोजी अय्यप्पन यांचा जन्म झाला होता. त्यांनी वर्ष 1975 मध्ये बॅचलरऑफ फिशरीज सायन्समध्ये शिक्षण पूर्ण केले होते. यानंतर वर्ष 1977 मध्ये मास्टर ऑफ फिशरीज सायन्सची डिग्री मंगळुरू येथून मिळवली होती. बंगळुरूतील कृषी युनिव्हर्सिटीमधून वर्ष 1988 मध्ये पीएचडी केली.

PREV

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!