‘ऑपरेशन शील्ड’चा मॉक ड्रिल पुढे ढकलला; नवीन तारीख लवकरच जाहीर होणार

Published : May 29, 2025, 09:55 AM IST
mock drill

सार

पाकिस्तान लगतच्या सीमावर्ती भागांमध्ये ऑपरेशन शील्डचे मॉक ड्रिल 29 मे ला पार पडणार होते. पण हीच तारीख आता पुढे ढकलली असून लवकरच याबद्दलची नवी तारीख जाहीर केली जाईल असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. 

Operation Shield Mock Drill :  सीमावर्ती राज्यांमध्ये गुरुवार, २९ मे रोजी होणार असलेला ‘ऑपरेशन शील्ड’ या नागरी संरक्षण मॉक ड्रिलला प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. केंद्र सरकारने या संदर्भात आदेश जारी करत सर्व संबंधित नागरी संरक्षण नियंत्रण केंद्रांना आणि इतर विभागांना तात्काळ सूचना देण्यास सांगितले आहे.

गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार, "सर्व संबंधित अधिकारी आणि भागधारकांना कळवावे की 'ऑपरेशन शील्ड' नागरी संरक्षण सराव पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. या सरावाची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल," असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

या सरावात गुजरात, राजस्थान, जम्मू-काश्मीर, हरयाणा आणि चंदीगडसह विविध केंद्रशासित प्रदेशांतील जिल्ह्यांमध्ये हवाई हल्ले, ब्लॅकआउट, आपत्कालीन स्थलांतर आणि वैद्यकीय मदतीसंबंधी कृतींचा सराव केला जाणार होता. या सरावाचा उद्देश म्हणजे आपत्तीच्या वेळी नागरी आणि प्रशासकीय यंत्रणांची तयारी तपासणे होता.

मात्र आता या सरावांची अंमलबजावणी पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्यात आली आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमधील सर्व २० जिल्ह्यांमध्ये उद्या होणाऱ्या मॉक ड्रिल रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय, राजस्थान, गुजरात, हरयाणा, चंदीगड या राज्यांनीही केंद्राच्या आदेशानंतर मॉक ड्रिल आणि संभाव्य ब्लॅकआउट पुढे ढकलले आहेत.

गुजरातच्या माहिती विभागाने आणि राजस्थानच्या गृह विभागाने याबाबत अधिकृतपणे घोषणा केली असून, चंदीगड प्रशासनाने देखील गुरुवारी कोणताही ब्लॅकआउट किंवा मॉक ड्रिल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. संपूर्ण सरावाची नवीन तारीख आणि सुधारित कार्यक्रम लवकरच अधिकृतरित्या जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

स्मृती इराणींनी वयाच्या ५० व्या वर्षी घटवलं २७ किलो वजन! 'ही' सोपी ट्रिक वापरून झाल्या सुपरफिट, ओळखणंही झालं कठीण!
संसदेत ई-सिगारेट कोणी ओढली? खासदार अनुराग ठाकूर यांचा TMC वर गंभीर आरोप