
नवी दिल्ली - भारत सरकारच्या सूचनेनंतर उत्तर आणि पश्चिम भारतातील २० विमानतळांवरील नागरी उड्डाणे १० मे सकाळी ५:२९ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. ही कारवाई पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय हवाई दलाने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.
लेह, श्रीनगर, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, जामनगर, भटिंडा, भुज, धर्मशाळा, शिमला, राजकोट, पोरबंदर, बीकानेर, हिंडन, किशनगढ, कांडला आणि ग्वाल्हेर.
इंडिगो:
सरकारच्या नोटिफिकेशननंतर १६५ हून अधिक उड्डाणे रद्द. प्रवाशांना पूर्ण परतावा किंवा विनाशुल्क रिअबुकिंगची सुविधा दिली आहे.
एअर इंडिया:
जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट येथील उड्डाणे १० मेपर्यंत रद्द. प्रवाशांना एकदाच रिअबुकिंग किंवा पूर्ण परताव्याचा पर्याय.
एअर इंडिया एक्सप्रेस:
अमृतसर, ग्वाल्हेर, जम्मू, श्रीनगर आणि हिंडन येथील उड्डाणांवर रद्द किंवा मोफत रिअबुकिंगची सुविधा.
स्पाईसजेट:
धर्मशाळा, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर भारतातील उड्डाणांवर परिणाम; पुढील सूचना येईपर्यंत सेवा स्थगित.
२६ एप्रिलपासून पाकिस्तानने भारतीय उड्डाणांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यानंतर ६ मेपासून बहुतेक परदेशी विमान कंपन्यांनी देखील पाकिस्तानवरून उड्डाण करणे थांबवले आहे.
सिंगापूर एअरलाईन्स व स्कूट:
पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राऐवजी पर्यायी मार्गांचा वापर; त्यामुळे काही उड्डाणांमध्ये वेळ वाढणार.
KLM (नेदरलँड्स):
अॅमस्टरडॅम–दिल्ली फ्लाइट १ तास तर अॅमस्टरडॅम–मुंबई फ्लाइट १ तास १५ मिनिटांनी जास्त वेळ घेणार.
युनायटेड एअरलाईन्स (USA):
न्यूयॉर्क–दिल्ली उड्डाण रद्द; पुढील स्थितीवर लक्ष ठेवून निर्णय घेतला जाईल.