
नवी दिल्ली : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ने एप्रिल 2025 सत्रासाठीच्या 10वी (सेकंडरी) वर्गाच्या परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी घेतला होता, ते आता NIOS च्या अधिकृत संकेतस्थळावर results.nios.ac.in आपला निकाल पाहू शकतात.
विद्यार्थ्यांनी निकाल पाहताना आपला नोंदणी क्रमांक (Enrollment Number) आणि हॉल तिकीट जवळ ठेवणे आवश्यक आहे. यामुळे लॉगिन प्रक्रिया सुलभ होईल. निकाल SMS आणि DigiLocker च्या माध्यमातून देखील उपलब्ध आहे.
स्टेप-१: अधिकृत निकाल संकेतस्थळाला भेट द्या, results.nios.ac.in
स्टेप-२: "Public Exam Result" या लिंकवर क्लिक करा
स्टेप-३: आपला Enrollment Number आणि Captcha Code भरा
स्टेप-४: “Submit” बटणावर क्लिक करा
स्टेप-५: स्क्रीनवर आपला निकाल दिसेल. तो डाउनलोड आणि प्रिंट करून ठेवा
ऑनलाइन मिळालेली मार्कशीट ही तात्पुरती (Provisional) असेल. तिची एक छायांकित प्रत भविष्यातील वापरासाठी ठेवा.
मूळ मार्कशीट व उत्तीर्ण प्रमाणपत्र विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित स्टडी सेंटरमधूनच गोळा करावी.
जर निकालात कोणतीही चूक किंवा विसंगती आढळली, तर त्याबाबत 30 दिवसांच्या आत सुधारणा विनंती करता येते. यासाठी प्रत्येक बदलासाठी ₹50 शुल्क आकारले जाईल.
results.nios.ac.in
NIOS 10वीचा हा निकाल विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!