NIA चा मोठा खुलासा ! रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाचे धागेदोरे पाकिस्तानमध्ये ?

Published : Apr 21, 2024, 10:55 AM ISTUpdated : Apr 21, 2024, 11:07 AM IST
NIA

सार

बंगळुरू येथील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात एनआयएला तपासात मोठे यश आले आहे. यावेळी एनआयएने सांगितले की, तापसादरम्यान ते ऑनलाइन हँडलर ओळखण्याचा प्रयत्न करत होते यामध्ये त्यांना एक सांकेतिक नावाचा तपास लागला आहे. 

बंगळुरू येथील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात एनआयएला तपासात मोठे यश आले आहे. यावेळी एनआयएने सांगितले की, तापसादरम्यान ते ऑनलाइन हँडलर ओळखण्याचा प्रयत्न करत होते यामध्ये त्यांना एक सांकेतिक नावाचा तपास लागला आहे.हे सांकेतिक नाव कर्नल असून एनआयएच्या अधिकाऱ्यांनी यावर संशय व्यक्त केला आहे. कर्नल हे 2019-20 मध्ये आयएस अल-हिंद मॉड्यूलमध्ये सामील झाल्यानंतर अटक करण्यात आलेले दहशतवादी अब्दुल मतीन ताहा आणि मुसाविर हुसेन शाजिब यांच्या संपर्कात होते. आयएस अल-हिंद दक्षिणी भागातील अनेक तरुणांना क्रिप्टो वॉलेटद्वारे पैसे पाठवत असते,असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय तो धार्मिक स्थळे, हिंदू नेते आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्यास ते प्रवृत्त करत असल्याचा देखील संशय कर्नल यांच्यावर आहे.

दहशतवाद विरोधी पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर हि माहिती दिली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये मंगळुरु ऑटो रिक्षा स्फोटानंतर कर्नल नावाच्या हँडलरबद्दल आम्ही ऐकले होते.तो बहुदा अबुधाबी मधून काम पाहतो असा अंदाज आहे.इस्लामिक स्टेट गटाचे छोटे मॉड्यूल तयार करून दहशतवादी कारवाया पुन्हा सुरू करण्यासाठी या एजन्सी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ची मदत घेत असत. अशा प्रकारे पाकिस्तानी गुप्तचर संस्था कर्नल सांकेतिक नाव असलेल्या व्यक्तीशी जवळून काम करत आहे .

एनआयएचे आयएस मॉड्यूलबाबत मोठे खुलासे :

१ मार्च रोजी झालेल्या बॉम्ब स्फोटातील संशयित दहशतवादी ताहा आणि शाजिब यांना १२ मार्च रोजी कोलकाता येथून अटक केली होती. ज्यात नऊ जण जखमी झाले होते. या दोघांची कसून चौकशी सुरु असून त्यांना कर्नल कोण आहे, त्याची ओळख कशी झाली, भविष्यातील दहशवादी योजना काय ? याचा तपास एनआयए करत आहे. तसेच शिवमोग्गा आयएस मॉड्यूलच्या इतर सदस्यांबद्दल त्याची चौकशी केली जात आहे. एनआयएच्या आरोपपत्रानुसार, ताहा आणि शाजिब हे पूर्वी 20 सदस्यीय अल-हिंद मॉड्यूलचा भाग होते, ज्यांनी दक्षिण भारतातील जंगलात आयएस प्रांत स्थापन करण्याची योजना आखली होती.

अल-हिंद मॉड्यूलने बेंगळुरू स्थित मेहबूब पाशा आणि कुड्डालोर स्थित खाजा मोईदीन यांच्या नेतृत्वाखाली काम केले. ही टोळी बेंगळुरूच्या गुरप्पानापल्या येथील अल-हिंद ट्रस्टच्या कार्यालयातून कार्यरत होती, त्यांनी कर्नाटकच्या जंगलात IS प्रांत स्थापन करण्याची योजना आखली होती.

 

PREV

Recommended Stories

EMI मध्ये मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट घटवला, जाणून घ्या फायदा
Gold Price : डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला; सोन्याच्या दरात एका आठवड्यात चक्क 5 हजारांनी वाढ, वाचा दर