FASTag Offer: टोल प्लाझावर घाणेरडं टॉयलेट दिसलं? फोटो पाठवा आणि ₹1000 जिंका!

vivek panmand   | CMS
Published : Oct 17, 2026, 09:45 PM IST
FASTag Offer: टोल प्लाझावर घाणेरडं टॉयलेट दिसलं? फोटो पाठवा आणि ₹1000 जिंका!

सार

टोल प्लाझावरील टॉयलेट्सची स्वच्छता सुधारण्यासाठी NHAI ने 'स्वच्छ शौचालय फोटो चॅलेंज' सुरू केलंय. 'राजमार्ग यात्रा' ॲपवरून घाणेरड्या टॉयलेटचा फोटो पाठवल्यास तुम्हाला ₹1000 चा फास्टॅग मिळू शकतो.

नवी दिल्ली (17 ऑक्टोबर): तुम्ही हायवेने प्रवास करत आहात आणि टोल प्लाझावर टॉयलेट एकदम घाणेरडं किंवा दुर्गंधीयुक्त आढळलं? तर लगेच त्याचा फोटो काढा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) पाठवा. असं केल्यास तुम्हाला ₹1000 चा मोफत फास्टॅग (FASTag) जिंकण्याची संधी आहे!

टोल प्लाझावरील टॉयलेट्सची अवस्था सुधारण्यासाठी NHAI ने प्रवाशांना ही भन्नाट ऑफर दिली आहे. यासाठी देशभरात 'स्वच्छ शौचालय फोटो चॅलेंज' सुरू करण्यात आलंय.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना 'राजमार्ग यात्रा' (Rajmarg Yatra) ॲप वापरून टॉयलेटचे जिओ-टॅग केलेले फोटो अपलोड करावे लागतील. यासोबतच प्रवाशांना स्वतःचं नाव, ठिकाण, गाडीचा नंबर आणि मोबाईल नंबरही द्यावा लागेल.

तुमची तक्रार खरी ठरल्यास, तुमच्या गाडीच्या फास्टॅगवर ₹1000 चं मोफत रिचार्ज केलं जाईल. हे चॅलेंज 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर ते लागू असेल.

फक्त पहिली तक्रार ग्राह्य धरणार

एका गाडीला फक्त एकदाच हे रिचार्ज मिळेल. तसंच, एका टॉयलेटबद्दल दिवसातून फक्त एकच तक्रार ग्राह्य धरली जाईल. जर एकाच टॉयलेटबद्दल अनेक तक्रारी आल्या, तर ज्याने सर्वात आधी तक्रार केलीय, त्याचाच विचार होईल. खोटे, एडिट केलेले किंवा जुने फोटो थेट रिजेक्ट केले जातील. मंत्रालयाने स्पष्ट केलंय की, एआय (AI) स्क्रीनिंग आणि प्रत्यक्ष पडताळणी करूनच या फोटोंची खात्री केली जाईल.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Karnataka Governor Dr Sudha Yadav: पदभार स्वीकारताच राज्यपाल डॉ. सुधा यादव यांनी घेतलं शारदा मातेचं दर्शन, मंत्री के. जे. जॉर्जही होते सोबत
Dehradun Highway Truck Viral Video: भिंतीवरील चित्र खरा रस्ता समजला, ट्रक थेट भिंतीत घुसला!