राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना मिळाले तिकीट

Published : Mar 30, 2024, 05:52 PM IST
Sharad Pawar Supriya sule

सार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून पाच उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले असून ते लोकसभेला पक्षाकडून उभे राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून पाच उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले असून ते लोकसभेला पक्षाकडून उभे राहणार आहेत. या पहिल्या यादीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली असून  नुकतेच अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेल्या निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही यादी जाहीर केली आहे. आपण कोणाला कुठून उमेदवारी मिळाली हे आधी पाहुयात. 
कोणाला कोठून उमेदवारी

  • वर्धा- अमर काळे
  • दिंडोरी- भास्करराव भगरे
  • बारामती-सुप्रिया सुळे
  • शिरुर- डॉ. अमोल कोल्हे
  • अहमदनगर- निलेश लंके

अमर काळे आणि निलेश लंके यांना संधी देण्यात आली आहे. नुकताच शरद पवार गटात प्रवेश केलेल्या अमर काळे आणि निलेश लंके यांना तिकीट जाहीर करण्यात आली आहे. निलेश लंके यांना अहमदनगरमधून तर अमर काळे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना चौथ्यांदा तिकीट जाहीर करण्यात आले. सुप्रिया सुळे यांची कोणाशी लढत होते हे लवकरच लक्षात येणार आहे. 

PREV

Recommended Stories

Indigo मुळे नवविवाहित जोडप्याचे अपरिमित नुकसान, स्वतःच्या रिसेप्शनला लावली 'व्हर्च्युअल' हजेरी!
EMI मध्ये मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट घटवला, कर्ज घेणे होणार स्वस्त, जाणून घ्या फायदा