सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप, भूस्खलनामुळे 9 जणांचा मृत्यू तर 1200 पर्यटक अडकले

मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी मिंटोकगुंग येथे एका उच्चस्तरीय बैठक घेतली.

 

Rameshwar Gavhane | Published : Jun 15, 2024 9:18 AM IST

सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात संततधार पावसाने झालेल्या भूस्खलनामुळे 15 परदेशी नागरिकांसह 1200 हून अधिक पर्यटक अडकले आहेत. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. राज्यात भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.

जवळवास 1200 हून अधिक पर्यटक हे मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकून पडले आहेत. सिक्कीम पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे प्रधान सचिव सी एस राव यांनी एका निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. मंगन जिल्ह्यातील लाचुंगमध्ये भारतातील तीन, बांगलादेशातील 10 जण अडकले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी मिंटोकगुंग येथे एका उच्चस्तरीय बैठक घेतली. डोंगराळ राज्याला भूस्खलनाचा मोठा फटका बसला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी अडकलेल्या पर्यटकांना आहेत त्याठिकाणी थांबा आणि धोका पत्करू नका असं सांगितलं आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अडकलेल्या सर्व पर्यटकांसाठी रेशनचा पुरेसा साठा आहे. हवामानाच्या परिस्थितीनुसार सर्व पर्यटकांना हवाई मार्गाने आणण्यासाठी मुख्य सचिव कार्यालयाने केंद्राशी बोलणी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. मंगनमधील जिल्हा प्रशासन, पोलीस आणि पर्यटन अधिकारी यांच्याशी समन्वय साधून अडकलेल्या लोकांची सुटका करत आहे.

अनेक घरं गेली पाण्याखाली

आणखी एका अधिकाऱ्याने सांगितलं की, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले ज्यामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली, नुकसान झाले, तर विद्युत खांब वाहून गेले. संततधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. संगकलांग येथे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांधलेला पूल कोसळला, ज्यामुळे उत्तर सिक्कीममध्ये मोठ्या संख्येने पर्यटक अडकले.

आणखी वाचा :

बेंगळुरूची कायना खरे बनली जगातील सर्वात तरुण मास्टर स्कूबा डायव्हर

 

Share this article