छत्तीसगडमध्ये मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, १७ जण ठार

Published : May 20, 2024, 06:00 PM IST
accident news 02.jpg

सार

छत्तीसगडमधील कवार्धा येथे झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत १७ जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. पिकअप व्हॅन खोल खड्ड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे.

छत्तीसगडमधील कवार्धा येथे झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत १७ जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. पिकअप व्हॅन खोल खड्ड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच गाडीमध्ये २५ ते ३० जण होते असेही कळते. कवार्धाचे एसपी अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, कवार्धा परिसरात पिकअप वाहन उलटल्याने मोठा अपघात झाला. यात आठ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले की, कवार्धा येथे मजुरांनी भरलेले पिकअप वाहन पलटी झाल्याने काहींचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. यामध्ये ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्व कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी कामना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत पुरवत आहे. संबंधित वाहन कामगारांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. सर्व मजूर आपले काम उरकून परतत असताना त्यांचे वाहन एका खोल खड्ड्यात पडले.

या भीषण रस्ता अपघाताने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेले पोलीस पथक आणि स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना कवार्धा येथील कुकडूर पोलीस स्टेशन परिसरातील बहपनी गावाजवळ घडली. वाहनात असलेले मजूर त्यांचे काम उरकल्यानंतर घरी परतत होते. घरी परतत असताना पिकअप वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी २० फूट खड्ड्यात पलटी झाली.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!