ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी रास बदलतो. अशा प्रकारे राशी बदलणे मानवी जीवनावर, विशेषतः त्या राशींशी संबंधित लोकांवर, अधिक परिणाम करते. हे बदल काही राशींना अनपेक्षित लाभ देतात, तर काही राशींना तोटा देखील होऊ शकतो. या सर्व ग्रहांपैकी बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, ज्ञान आणि मैत्रीशी संबंधित मानले जाते. असा हा बुध ग्रह मे महिन्यात रास बदलणार आहे. यामुळे तीन राशींना अनपेक्षित लाभ होणार आहेत.