Viral Video : माचा जिलेबी आणि स्ट्रॉबेरी लस्सी, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला!

Published : Jun 06, 2026, 02:15 PM IST
Viral Video : माचा जिलेबी आणि स्ट्रॉबेरी लस्सी, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला!

सार

Viral Video : माचा जिलेबी आणि स्ट्रॉबेरी लस्सीचा एक विचित्र फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा नवा फूड ट्रेंड पाहून खवय्ये मात्र गोंधळले आहेत. काही जणांना हा प्रयोग आवडलाय, तर काहींनी यावर सडकून टीका केली आहे.

Viral Video : सध्या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. त्यातल्या त्यात खाण्यापिण्याच्या प्रयोगांचे (food experiments) व्हिडीओ आणि फोटो तर नेहमीच चर्चेत असतात. पण सध्या एका विचित्र फूड कॉम्बिनेशनने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. एका व्हायरल पोस्टमध्ये हिरव्यागार रंगाची माचा जिलेबी आणि सोबत स्ट्रॉबेरी लस्सी दिसत आहे. हे पाहून भारतीय खवय्ये चक्रावून गेले आहेत.

हा विचित्र प्रकार आला कुठून?

आपल्या सर्वांची लाडकी, कुरकुरीत आणि साखरेच्या पाकात घोळवलेली जिलेबी तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण या जिलेबीला माचा (matcha) वापरून एक नवा 'ट्विस्ट' देण्यात आला आहे. माचा म्हणजे जपानमधील एक प्रकारची ग्रीन टी पावडर, जी आजकाल अनेक आधुनिक मिठायांमध्ये वापरली जाते. हा फोटो X (पूर्वीचं ट्विटर) वर शेअर झाल्यावर तो लगेचच व्हायरल झाला. अनेकांना तर हे कॉम्बिनेशन काय आहे हेच कळत नव्हतं.

 

 

या जिलेबीसोबत स्ट्रॉबेरी फ्लेवरची लस्सी होती. आपली पारंपरिक गोड किंवा खारट लस्सी सोडून हा एक वेगळाच प्रकार होता. या दोन्ही विचित्र पदार्थांच्या जोडीमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा फोटो व्हायरल होताच त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेक युझर्सनी अशा प्रयोगांची गरजच काय? असा सवाल केला. काहींनी तर 'या प्रयोगाने हद्द पार केली' असं म्हणत याला थेट नापसंती दर्शवली. तर काही जणांनी 'असे पदार्थ अस्तित्वातच नसावेत' अशी मजेशीर कमेंट केली.

मात्र, काही युझर्सनी उत्सुकतेपोटी एकदा तरी चव घ्यायला आवडेल, असंही म्हटलं. पण तरीही, बहुतांश लोकांनी यावर नाराजीच व्यक्त केली आणि पारंपरिक पदार्थांमध्ये असे बदल करू नयेत, असं मत मांडलं. या व्हायरल पोस्टमुळे पुन्हा एकदा हा वाद सुरू झाला आहे की, खाण्यातील नवे प्रयोग ही नवनिर्मिती आहे की निव्वळ परंपरेचा अपमान?

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Tatkal Passport: अर्जंट परदेशात जायचंय? फक्त 3 दिवसांत पासपोर्ट हातात मिळेल
IT Rules: सेव्हिंग्ज अकाऊंटमध्ये किती पैसे ठेवावेत? इन्कम टॅक्सची नोटीस का येते?