Lucky Daughter : लेक आली भाग्याला; जन्मानंतर अवघ्या 24 तासांत बाप झाला करोडपती

Published : Nov 12, 2026, 01:08 PM IST
Baby

सार

लेक म्हणजे साक्षात लक्ष्मी! एका कुटुंबासाठी हे खरं ठरलं आहे. पंजाबमध्ये एका सुताराला मुलगी झाल्याच्या 24 तासांतच दीड कोटींची लॉटरी लागली आहे.

पंजाब : मुलगी म्हणजे घरची महालक्ष्मी असं म्हणतात. पंजाबमध्ये घडलेल्या एका घटनेनं हे पुन्हा एकदा खरं करून दाखवलंय. एका चिमुकलीच्या जन्मानं तिच्या वडिलांचं नशीबच पालटून टाकलंय. लेक जन्मल्यानंतर फक्त 24 तासांत वडिलांना चक्क 1.5 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे.

लेक ठरली लकी

पंजाबमध्ये राहणारा 24 वर्षांचा युद्धवीर सिंग हा सुतारकाम करतो. नुकतीच त्याची पत्नी हरमन हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. कुटुंबातील काहींना मुलगा हवा होता. त्यामुळे मुलगी झाल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण ही चिमुकली जन्माला आल्यावर काही तासांतच संपूर्ण कुटुंबाची परिस्थिती बदलून गेली.

मुलीच्या जन्मानंतर अवघ्या 24 तासांतच युद्धवीर सिंगला 1.5 कोटी रुपयांची लॉटरी लागली. त्यामुळे आपल्या घरात मुलीनं भाग्य आणि समृद्धी आणली, असा कुटुंबाचा विश्वास आहे. म्हणूनच युद्धवीरनं आपल्या मुलीचं नाव 'बरकत' असं ठेवलं आहे.

पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील बरेटा शहरात राहणाऱ्या युद्धवीर सिंगने 'पंजाब स्टेट डियर 200' या मासिक लॉटरीचं पहिलं बक्षीस जिंकलंय. 6 नोव्हेंबरला तो बाप झाला आणि 7 नोव्हेंबरला लॉटरी विजेत्यांची घोषणा झाली. लेक आल्याबरोबर नशीब उजळलं म्हणून त्यांनी तिचं नाव बरकत असं ठेवलं.

दवाखान्यात जाताना घेतलेलं तिकीट

4 नोव्हेंबरला युद्धवीर सिंग त्याची गरोदर पत्नी हरमनला तपासणीसाठी मानसा इथल्या दवाखान्यात घेऊन जात होता. त्यावेळी त्याने बुधलाडा इथल्या एका लॉटरी दुकानातून तिकीट विकत घेतलं. खरं तर त्याला लॉटरीचं तिकीट घ्यायचंच नव्हतं. वाटेत मोबाईल नंबर पोर्ट करण्याचं काम होतं, म्हणून तो तिथे थांबला. तेव्हा असंच आपलं नशीब आजमावून बघूया म्हणून त्याने लॉटरीचं तिकीट घेतलं. पण हेच तिकीट आपलं आयुष्य बदलेल, याचा त्याला जराही अंदाज नव्हता.

युद्धवीरने लॉटरीचं तिकीट घेतलेलं त्याची पत्नी हरमन हिला फारसं आवडलं नव्हतं. कारण कुटुंब आधीच आर्थिक संकटात होतं. दवाखाना आणि औषधांसाठी त्यांना एक-एक रुपया राखून खर्च करावा लागत होता. पण मुलगी झाल्यावर लगेच 1.5 कोटींची लॉटरी लागल्याने त्यांच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आपलं नशीब मुलीमुळेच बदललं, अशी युद्धवीरची भावना आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Gulabrao Patil | Sanjay Raut | संजय राऊतांच्या दाव्यांवर गुलाबराव पाटलांचा टोला
IRCTC Food Issue : ट्रेनमध्ये जेवणाच्या डाळीत सापडला भांडी घासायच्या तारेचा तुकडा; IRCTC ने ठोठावला दंड