Lotte Choco Pie : सावधान! 'या' बॅचचे चोको पाय खाणं धोकादायक, बाजारातून परत मागवण्याचे आदेश

Published : Aug 15, 2026, 03:13 PM IST
Lotte Choco Pie : सावधान! 'या' बॅचचे चोको पाय खाणं धोकादायक, बाजारातून परत मागवण्याचे आदेश

सार

लोकप्रिय 'लोट्टे चोको पाय'च्या 'NM10DC2' बॅचमध्ये ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त केमिकल प्रिझर्व्हेटिव्ह (Preservatives) सापडले आहेत.

नवी दिल्ली : लोकप्रिय चॉकलेट 'लोट्टे चोको पाय' (Lotte Choco Pie) मध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त केमिकल प्रिझर्व्हेटिव्ह (Preservatives) आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा विभागाने हे चॉकलेट न खाण्याचा इशारा नागरिकांना दिला आहे. विशेषतः १० एप्रिल २०२६ रोजी तयार झालेल्या 'NM10DC2' या बॅचची उत्पादनं बाजारातून त्वरित मागे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातून चोको पायचे काही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. हे नमुने भोपाळमधील केंद्रीय प्रयोगशाळेत (Central Laboratory) पाठवण्यात आले. या तपासणीत असं दिसून आलं की, चोको पायमध्ये माणसांसाठी परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा खूप जास्त प्रमाणात प्रिझर्व्हेटिव्ह वापरण्यात आले आहेत.

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, दुर्गच्या अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, "तपासणी अहवालात हे स्पष्ट झालं आहे की, यात परवानगीपेक्षा जास्त प्रिझर्व्हेटिव्ह आहेत. याचा लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे देशभरात विकल्या गेलेल्या या विशिष्ट बॅचची सर्व उत्पादनं कंपनीने त्वरित बाजारातून परत मागवावीत, असे आदेश आम्ही दिले आहेत."

२१ जुलै रोजी तपासणीसाठी पाठवलेल्या या नमुन्यांचा रिपोर्ट आता समोर आला आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार हे उत्पादन मानवी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे.

विक्री आणि साठवणुकीवर पूर्ण बंदी

लॅबचा रिपोर्ट मिळताच दुर्ग जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई केली आहे. जिल्ह्यात या बॅचच्या लोट्टे चोको पायची विक्री, साठवणूक आणि वितरणावर त्वरित बंदी घालण्यात आली आहे. वितरक, वाहतूकदार आणि लहान-मोठ्या दुकानदारांना या बॅचची उत्पादनं विकू नयेत, असा सक्त इशारा देण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ आणि नियम २०११ नुसार, 'NM10DC2' ही बॅच बाजारातून पूर्णपणे काढून घेण्याचे निर्देश चेन्नईतील कंपनीच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत. यापुढेही जर या बॅचची उत्पादनं बाजारात विकताना आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Work-Life Balance: 'रविवार म्हणजे कामाचाच दिवस', पण ICU मधील 4 महिन्यांनी आयुष्यच बदललं; बंगळूरुच्या उद्योजकाची गोष्ट
Global Fintech Fest 2026 | ग्लोबल फिनटेक फेस्टचं नरेंद्र मोदींकडून उद्घाटन | PM Narendra Modi