
तिरुवनंतपुरम: कलमस्सेरी स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचं काम सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी, २७ ऑक्टोबरला बेंगळुरू-एर्नाकुलम वंदे भारत एक्सप्रेस अंशतः रद्द केली आहे. तसेच काही गाड्यांना उशीर होईल, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
केएसआर बेंगळुरू-एर्नाकुलम जंक्शन (26651) वंदे भारत एक्सप्रेस मंगळवारी त्रिशूर आणि एर्नाकुलम दरम्यान धावणार नाही. या ट्रेनचा प्रवास मंगळवारी त्रिशूरलाच संपेल.
परतीच्या प्रवासात, एर्नाकुलम जंक्शन-केएसआर बेंगळुरू (26652) ही ट्रेन मंगळवारी त्रिशूरवरूनच सुटेल. एर्नाकुलम आणि त्रिशूर दरम्यानची तिची फेरी रद्द केली आहे. ही ट्रेन दुपारी ३.२० वाजता त्रिशूरवरून बेंगळुरूकडे रवाना होईल.
एर्नाकुलम जंक्शन-हजरत निजामुद्दीन मंगला लक्षद्वीप सुपरफास्ट एक्सप्रेस (12617) मंगळवारी दुपारी ०२.५५ वाजता एर्नाकुलम जंक्शनवरून सुटेल.
मंगळुरू सेंट्रल-कन्याकुमारी परशुराम एक्सप्रेस (16649) एक तास १५ मिनिटे उशिराने धावेल. तिरुवनंतपुरम सेंट्रल-लोकमान्य टिळक नेत्रावती सुपरफास्ट एक्सप्रेस (16346) एक तास २० मिनिटे उशिराने धावेल. तर, तिरुनेलवेली-जामनगर एक्सप्रेस (19577) ४० मिनिटे उशिराने धावेल.
#palakkaddivision #southernrailways #indianrailways https://t.co/fHXEJfY6Z9
— Palakkad Division (@DRMPalghat) October 23, 2026