Jammu Kashmir Landslide : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, 3 जणांचा मृत्यूसह शेकडोहून अधिक जणांना रेस्क्यू

Published : Apr 21, 2025, 09:00 AM IST
Jammu Kashmir Landslides

सार

Jammu Kashmir landslide : जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात झालेला तुफान पाऊस आणि ढगफुटीमुळे भूस्खलन झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुर देखील आला असून तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय 100 हून अधिक जणांचा रेस्क्यू केलेय. 

Jammu Kashmir landslide : जम्म-ूकाश्मीरमध्ये बदलत्या वातावरणामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. याचा फटका रामबन जिल्ह्यातील बागना परिसराला बसत येथे ढगफुटीची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. काही इमारती आणि वाहनांचे नुकसान झाले आहे. याशिवाय काही ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. रातोरात परिसरातील नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. काहींची घरे आणि दुकाने पुर्णपणे नष्ट झाली आहेत.

अचानक झालेल्या ढगफुटीमुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. या परिसरातील नागरिक सरकारला आमची घरे आणि दुकाने पूर्पणणे नष्ट झाल्याचे सांगत आहेत. नागरिकांचे असे म्हणणे आहे की, रात्री झालेल्या तुफान पावसामुळे सर्वकाही गमावले आहे. एसएसपी रामबन कुलबीर सिंह यांनी म्हटले की, पोलीस स्थानकांना अ‍ॅलर्ट करण्यात आले आहे. याशिवाय ढगफुटीच्या स्थितीनंतर आतापर्यंत धर्मकुंडातून शेकडोहून अधिक जणांना रेस्क्यू करण्यात आले आहे. सध्या अद्यापही बचाव कार्य घटनास्थळी सुरू आहे.

 

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले की, अधिकारी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत. जेथे गरज भासेल तेथे तत्काल बचाव कार्य केले जाईल.

रातोरात मार्केट गायब

रामबन येथील स्थानिक ओम सिंह यांनी म्हटले की, मी दुसऱ्या बाजूला राहतो. पण तेथे देखील पाणी खूप भरले आहे. आम्ही वेळीच येथे पोहोचू शकलो नाहीत. मी पाहिले की, माझ्या दुकानासह संपूर्ण मार्केट गायब झाले होते. हे पहिल्यांदाच असे काही झाल्याचे मी पाहिले आहे. रामबनमधील एक दुकानदार रवि कुमार यांनी म्हटले की, त्यांची दोन दुकाने आहेत, जी रातोरात गायब झाली आहे. या दुकानांमध्ये लाखो रुपयांचे सामान होते.

हॉटेलचे दोन मजले कोसळले

जम्मूमध्ये राहणारे सुनील कुमार यांनी सध्याची तेथील परिस्थिती पाहून दु:ख व्यक्त केले आहे. त्यांची नवी कार भूस्खलनात अडकली गेली असून त्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुनील कुमार यांनी म्हटले की, जम्मू वरुन मी श्रीनगरला जात होते. त्यावेळी पाऊस होता. यामुळे रामबन येथील एका हॉटेलमध्ये बुकिंग केले होते. पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. ज्यावेळी मी बाहेर आलो तेव्हा हॉटेलचे दोन मजले कोसळले गेले होते. वरच्या मजल्यावर जवळजवळ 15 जण होते. आम्ही सर्वांना वाचवले. भूस्खलनच्या कारणास्तव माझ्या नव्या कारचे नुकसान झाले. याशिवाय भूस्खलनात 8-10 गाड्या अडकल्या गेल्यात.

 

 

PREV

Recommended Stories

Goa Club Fire Update : गोव्यातील अग्निकांडबाबत मोठी अपडेट, क्लब मालक लुथ्रा बंधूंना थायलंडमध्ये अटक
IndGo प्रवाशांसाठी 'गुड न्यूज', तक्रार करताच ॲक्शन; मंत्रालयाची 'कंट्रोल रूम' ॲक्टिव्ह!