Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये चकमक, 2 दहशतवाद्यांचा खात्मा तर 1 जवान जखमी

Published : Jun 19, 2024, 04:47 PM ISTUpdated : Jun 19, 2024, 04:51 PM IST
jammu kashmir encounter

सार

Jammu-Kashmir : सध्या परिसरात सुरक्षादलाची शोधमोहिम सुरू आहे. 

Jammu-Kashmir : गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी राज्यात बंदोबस्त वाढवला आहे. अशातच आज काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून एक एसओजी (जम्मू-काश्मीर पोलीस) जवान जखमी झाला आहे.

भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई सुरू असल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्ह्यातील सोपोरमधील हदीपोरा भागात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. यावेळी अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देण्यासाठी गोळीबार केला, या घटनेत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. मात्र, अद्याप दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. या चकमकीत एसओजीच्या एका जवानाला गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या परिसरात शोधमोहिम सुरू आहे. याशिवाय रियासी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितालाही ताब्यात घेतले आहे.

 आणखी वाचा :

शरद पवार आषाढी वारीत बारामती-सणसर चालणार, 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' उपक्रमात होणार सहभागी

 

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!
Indigo मुळे नवविवाहित जोडप्याचे अपरिमित नुकसान, स्वतःच्या रिसेप्शनला लावली 'व्हर्च्युअल' हजेरी!